Ambarnath Portal
Directory, updates, and community links
Gudi Padwa Greetings

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

10 May 2026

5 linked posts
साखरपुडा समारंभ Photos

बदलापूर ईस्ट येथे संपन्न झालेल्या चि.सौ.कां. मानसी व चि. कल्पेश यांच्या साखरपुडा समारंभाला उपस्थित राहण्याचा योग आला. आनंद, उत्साह आणि आपुलकीच्या वातावरणात हा सोहळा पार पडला.

या शुभ प्रसंगी नवदांपत्यास भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत, त्यांच्या संसारवेलीवर प्रेम, विश्वास, आनंद आणि समृद्धीची फुले सदैव फुलत राहोत ही ईश्वरचरणी प्रार्थना..💐

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

उडान fest byte

गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान व जीबीके ग्रुप यांच्या सौजन्याने आयोजित “उडान फेस्ट २०२६ - स्वप्नांना देऊया भरारी" या भव्य प्रदर्शनाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून महिला उद्योजिकांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मी सर्वांना करते.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून महिलांच्या कला, उद्योग, व्यवसाय व आत्मविश्वासाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आपल्या शहरातील होतकरू महिला उद्योजिकांना पाठबळ देण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहावे.

📍 स्थळ : स्वानंद हॉल, स्वानंद शॉपिंग सेंटर, बी केबिन रोड, अंबरनाथ पूर्व

🗓️ दिनांक : १२ मे (मंगळवार) व १३ मे (बुधवार) २०२६ आपली उपस्थिती महिलांच्या स्वप्नांना नवी भरारी देणारी ठरेल.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

कविवर्य ग्रेस जयंती Graphic

भावनांच्या सूक्ष्म छटा, शब्दांची गूढ ताकद आणि मनाच्या खोलवर स्पर्श करणारी कविता यांचा अद्वितीय संगम म्हणजे कवीवर्य ग्रेस. मराठी साहित्यविश्वाला आपल्या लेखणीतून एक वेगळी ओळख देणाऱ्या या महान कवीस जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🏻

त्यांच्या कवितांमधील संवेदनशीलता, प्रेम, वेदना आणि जीवनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन आजही रसिकांच्या मनात कायम घर करून आहे. शब्दांच्या पलीकडचे भाव व्यक्त करणाऱ्या या विलक्षण साहित्यिकाची साहित्यसेवा सदैव प्रेरणादायी राहील.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

मातृदिन Graphic

“स्वामी तिन्ही जगाचा.. आईविना भिकारी!

आई हीच आपल्या आयुष्याची खरी शक्ती, प्रेरणा आणि मायेची सावली असते. तिच्या प्रेमाला, त्यागाला आणि संस्कारांना कोणतीही तुलना नाही. आईच्या आशीर्वादानेच आयुष्याला योग्य दिशा आणि यश मिळत असते. आईचे ऋण शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे.

जगातील सर्व मातांना मातृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

हळदी व वाढदिवस कार्यक्रम Photos

चि.सौ.कां. सविता व चि. अजय यांच्या हळद समारंभाला उपस्थित राहण्याचा योग आला. यावेळी नवदाम्पत्याला भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांचा संसार सुख, समाधान, प्रेम व समृद्धीने फुलून यावा, यासाठी शुभाशीर्वाद देण्यात आले. ✨

तसेच विश्वजीत पॅराडाइस येथे देवांश कागळे याच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त भेट देत या निरागस चिमुकल्याला निरोगी, आनंदी व उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक आशीर्वाद देण्यात आले.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद