शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील वंचित, गरजू आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवी दिशा देणारे महान शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🏻
“कमवा आणि शिका” या विचारातून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश निर्माण केला. समाजपरिवर्तनासाठी शिक्षण हेच सर्वात प्रभावी माध्यम आहे, हा त्यांचा संदेश आजही प्रेरणादायी आहे. त्यांचे कार्य, त्याग आणि शिक्षणसेवेची परंपरा सदैव स्मरणात राहील.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷