Ambarnath Portal
Directory, updates, and community links
Gudi Padwa Greetings

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

08 May 2026

2 linked posts
SSC result अभिनंदन Graphic

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी (SSC) परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐

या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे पाठबळ आणि शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे आहे. उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आत्मविश्वासाने पुढे जावे, ह्याच शुभेच्छा!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

उडान fest बैठक Photos

स्वानंद हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या “उडान फेस्ट” प्रदर्शनाच्या अनुषंगाने स्टॉल धारक व सहभागी उद्योजिकांची नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत प्रदर्शनातील स्टॉलचे नियोजन, मांडणी, व्यवस्थापन तसेच सहभागींसाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

प्रदर्शन अधिक प्रभावी व सुबक पद्धतीने पार पडावे यासाठी विविध सूचना व नियोजनाची सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह फादर बॉडीतील महिला कार्यकर्त्या तसेच अंबरनाथमधील विविध भागांतील कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.

यावेळी सौ. कंचन ज्ञानधर मिश्रा (महिला मोर्चा अध्यक्षा, अंबरनाथ पूर्व), सौ. पौर्णिमा जाधव (महिला मोर्चा अध्यक्षा मंडळ २, अंबरनाथ पश्चिम) तसेच सौ. सोनिया म्हात्रे (महिला मोर्चा अध्यक्षा मंडळ १, अंबरनाथ पश्चिम) यांनी उपस्थित सहभागी महिलांना मार्गदर्शन करत प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या.

महिलांच्या कला, व्यवसाय व कौशल्यांना व्यासपीठ मिळवून देणारा “उडान फेस्ट” हा उपक्रम निश्चितच महिलांच्या आत्मविश्वासाला नवी उभारी देणारा ठरणार आहे.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद