संतश्रेष्ठ, संत चोखामेळा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🏻
अखंड विठ्ठल भक्ती, समतेचा संदेश आणि मानवतेची शिकवण आपल्या अभंगातून समाजापर्यंत पोहोचवणारे संत चोखामेळा महाराज हे वारकरी संप्रदायातील तेजस्वी संत होते. समाजातील भेदभावाला आपल्या विचारांनी आणि भक्तीने उत्तर देत त्यांनी समानतेचा मार्ग दाखवला.
त्यांचे जीवन, त्याग आणि विठ्ठल चरणी असलेली अखंड निष्ठा आजही समाजाला प्रेरणा देणारी आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण अभिवादन!
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷 Approved Posted https://www.instagram.com/p/DYB8Eo8iDdW/?igsh=cWExdDNncm1tdzZi https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02Ma7neeuMC7MLm2a22a7FxLGSPdTDV1Na5npz5ZfcERvfHuNJtrpr9WTTRE1rxoMJl&id=1565847999
7-May-2026 Insta/facebook
सिग्नल बंद निर्णय byte
1 Byte Video
उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता नागरिकांच्या तसेच वाहतूक चालक आणि पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
आज यासंदर्भातील अधिकृत पत्र काढण्यात आले असून उद्या म्हणजेच 8 मे पासून अंबरनाथ शहरात दुपारी 12 ते सायंकाळी 4 या वेळेत शहरातील प्रमुख सिग्नल तात्पुरते बंद ठेवण्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून प्रशासनास सहकार्य करावे, ही नम्र विनंती. जनहितासाठी घेतलेला हा निर्णय उष्णतेपासून दिलासा देणारा ठरणार आहे.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷 Approved Posted https://www.instagram.com/reel/DYCbrrPoadS/?igsh=MWtjODF4Mm44cWYyMw== https://fb.watch/GYhGj8b8qT/?
7-May-2026 Insta/facebook
स्वगणना जनजागृती
byte 1 Byte Video
“जन गणना २०२६” अंतर्गत १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या स्वगणनेच्या कालावधीत नागरिकांनी स्वतःहून आपली माहिती अचूकपणे नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे.
तसेच, या मोहिमेचा दुसरा टप्पा १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ दरम्यान राबविण्यात येणार असून या कालावधीत प्रगणक आपल्या घरी भेट देणार आहेत. नागरिकांनी त्यांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे तसेच स्वगणनेदरम्यान प्राप्त झालेला संदर्भ क्रमांक (Reference Number) प्रगणकांपर्यंत पोहोचवावा.
आपला सक्रिय सहभाग हा सुयोग्य नियोजन आणि विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. 🇮🇳
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷 Approved Posted https://www.instagram.com/reel/DYCq5WUIaWx/?igsh=MWgwbzA5ZWt3cjFqbA== https://fb.watch/GYp9Cd57RC/?
7-May-2026 Insta/facebook
नगरपरिषद कार्यालय Photos
10 Photos
आज अंबरनाथ नगरपरिषदेत शहरातील विविध भागांतून नागरिक आपल्या सूचना, तक्रारी व विविध समस्या मांडण्यासाठी आले होते. नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा तसेच इतर नागरी समस्यांबाबत आपली मते व अडचणी मांडल्या.
प्रत्येक नागरिकाचे म्हणणे शांतपणे ऐकून त्यांच्या समस्यांची गांभीर्याने दखल घेण्यात आली. यावेळी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना तात्काळ योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नागरिकांच्या प्रश्नांचे जलद आणि प्रभावी निराकरण करण्यावर भर देण्यात आला.
प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय राखत शहराच्या विकासासाठी तसेच नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अंबरनाथ नगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷 Approved Posted https://www.instagram.com/p/DYCjm20CJ8O/?img_index=2&igsh=MjRyc2RpOGtqajd0 https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0Xu8ufyoYQf7g6tPtJpAdzJgdVcNjqk52ru57cCL4c21pH4NrHGrpBbvJSyVS57t9l&id=1565847999
7-May-2026 Insta/facebook
अंबरनाथ प्रीमियर लीग 2026 Reel 1 Reel कोहोजगाव क्रीडा संकुल येथे अंबरनाथ क्रिकेट असोसिएशन आयोजित अंबरनाथ प्रीमियर लीग २०२६"च्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचा योग आला. ही भव्य क्रिकेट स्पर्धा दिनांक ७ मे ते १० मे २०२६ दरम्यान रंगणार असून शहरातील क्रिकेटप्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार आहे.
या स्पर्धेचे आयोजक नगरसेवक व अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. उमेश अनंत पाटील यांनी उत्कृष्ट नियोजनातून या स्पर्धेचे आयोजन केले आहे. यावेळी शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील, अंबरनाथ शहर उपाध्यक्ष श्री. प्रकाश वाळुंज, नगरसेवक श्री. प्रदीप पाटील, नगरसेविका सौ. दर्शना उमेश पाटील, नगरसेवक श्री. पवन वाळेकर, माजी नगरसेवक श्री. पंकज पाटील, अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, खेळाडू व क्रीडाप्रेमींची उत्स्फूर्त उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷