Ambarnath Portal
Directory, updates, and community links
Gudi Padwa Greetings

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

04 May 2026

3 linked posts
भाजपा ऐतिहासिक विजय Graphic

पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरी येथील भारतीय जनता पार्टीच्या ऐतिहासिक विजयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!

हा विजय म्हणजे जनतेने दिलेला विकासाला कौल, प्रामाणिक नेतृत्वावर ठेवलेला विश्वास आणि “सबका साथ, सबका विकास” या ध्येयधोरणाची पावती आहे.

नव्या आशा, नव्या संकल्प आणि नव्या ऊर्जेसह भारत अधिक सक्षम, समृद्ध आणि आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने पुढे जात आहे. या अभूतपूर्व विजयासाठी सर्व मतदार, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

जनगणना Graphic

भारताची जनगणना 2027 ही केवळ प्रक्रिया नसून आपल्या देशाच्या विकासाचा पाया आहे.

प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून या महत्त्वपूर्ण उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे.

1 मे 2026 ते 15 मे 2026 दरम्यान स्वतःची नोंदणी करून अचूक माहिती द्या आणि देशाच्या प्रगतीत आपला वाटा उचला. आपला सहभाग म्हणजे देशाच्या भविष्याला बळकटी! 🇮🇳

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

सी. पी. राधाकृष्णन वाढदिवस Graphic

भारताचे विद्यमान उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🙏🏻

आपल्या समृद्ध राजकीय अनुभवातून आणि जनसेवेच्या दृढ निष्ठेतून आपण देशाच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान देत आहात. आपल्या नेतृत्वातून राष्ट्राला नवी दिशा आणि प्रेरणा मिळत राहो, हीच सदिच्छा.

आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, आनंदी आयुष्य आणि भविष्यातील सर्व कार्यात यश संपादन होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! 🙏🏻

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद