Ambarnath Portal
Directory, updates, and community links
Gudi Padwa Greetings

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

02 May 2026

3 linked posts
प्रमोद महाजन स्मृतीदिन Graphic

भारतीय राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्व, दूरदृष्टीचे नेते आणि उत्कृष्ट संघटन कौशल्य असलेले स्व. प्रमोदजी महाजन यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🏻

त्यांनी केलेले कार्य, त्यांची कार्यपद्धती आणि देशसेवेसाठीचा त्यांचा समर्पित दृष्टिकोन आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या आठवणींना विनम्र अभिवादन करत, त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करूया.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

जनसंपर्क कार्यालय उद्घाटन Reel

छत्रपती शिवाजी महाराज नगर चौक, वडवली येथे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक श्री. मनेष नामदेव गुंजाळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.

या सोहळ्याला राज्य परिषद सदस्य मा. श्री.गुलाबराव करंजुले पाटील, कल्याण डोम्बिवली महानगर पालिका भाजप गटनेते नगरसेवक श्री शशिकांत कांबळे, कल्याण जिल्हा मा. जिल्हाध्यक्ष व SIR प्रमुख श्री नाना सूर्यवंशी, महिला जिल्हाध्यक्षा सौ अर्चना सूर्यवंशी, अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष व नगरसेवक श्री.विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील, अंबरनाथ पूर्व महिला अध्यक्षा सौ कंचन मिश्रा, नगरसेवक श्री.अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक उमेश पाटिल, नगरसेविका सौ मिना वाळेकर तसेच इतर मान्यवर, पदाधिकारी, नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

या नव्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होणार असून, स्थानिक विकासाला अधिक गती मिळणार आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

देवर्षी नारद जयंती Graphic

सत्य, धर्म आणि भक्तीचा संदेश देत अखंड विश्वात भ्रमण करणारे देवऋषी नारद यांना जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा! 🙏🏻

ज्ञान, संवाद आणि सद्भावनेचे प्रतीक देव ऋषी नारद त्यांच्या विचारांमधून आपल्याला सदैव सत्याचा मार्ग अनुसरण्याची आणि समाजात सकारात्मकता पसरवण्याची प्रेरणा मिळते. या पावन दिनानिमित्त आपणही आपल्या कृतीतून चांगुलपणा, प्रामाणिकपणा आणि सेवा भाव जपूया.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद