Ambarnath Portal
Directory, updates, and community links
Gudi Padwa Greetings

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

01 May 2026

7 linked posts
ऊर्स मिरवणूक Photos

आस्ताना मेहबूबे सुबहानी सर्व धर्म समाजसेवा संस्थेच्या वतीने आयोजित उर्स निमित्त कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग लाभला.

या सोहळ्यात सहभागी होत श्रद्धा, भक्ती आणि सर्वधर्म समभावाचा सुंदर अनुभव घेता आला. परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

या निमित्ताने समाजातील बंधुभाव, एकता आणि सामाजिक ऐक्य अधिक दृढ करण्याचा संदेश मिळाला. अशा प्रेरणादायी कार्यक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन समाजसेवेची भावना अधिक बळकट होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Green city स्पर्धा Photos

ग्रीन सिटी, अंबरनाथ येथे उत्साहपूर्ण वातावरणात ग्रीन सिटी प्रीमियर लीग या क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक खेळाडूंनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला.

तसेच महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून ग्रीन सिटी ग्राउंडवर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे आयोजन युवा मोर्चा अध्यक्ष, श्री. अतिश पाटील व नगरसेविका सौ. स्वाती पाटील यांनी केले होते. यामध्ये कॅरम, चेस, १०० मीटर धावण्याची शर्यत तसेच इतर विविध स्पर्धांचा समावेश होता.

या कार्यक्रमाला शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक श्री. मनीष गुंजाळ, नगरसेवक श्री. सुनील वाघे, समाजसेवक श्री. नितीन गुंजाळ, श्री. किशोर सोरखादे तसेच अनेक मान्यवर, खेळाडू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशा उपक्रमांमुळे परिसरातील युवकांना क्रीडाप्रती प्रोत्साहन मिळत असून, सामाजिक एकात्मता आणि उत्साहाला नवे बळ मिळत आहे.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

बौद्ध पौर्णिमा Photos

मोरीवली पाडा, अंबरनाथ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव मंडळातर्फे आयोजित २५७०व्या बौद्ध पौर्णिमेनिमित्त भेट देण्याचा योग आला.

यावेळी भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या विचारांना उजाळा देत समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांचा अंगीकार करण्याचा संकल्प करण्यात आला.

याप्रसंगी शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. उपस्थितांशी संवाद साधताना समाजात ऐक्य, शिक्षण आणि प्रगती यांना अधिक बळकटी देण्यावर भर देण्यात आला.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

१ मे दिनविशेष कार्यक्रम Reel

आज महाराष्ट्र दिन, कामगार दिन व बौद्धपौर्णिमेनिमित्त विविध ठिकाणी भेट देण्याचा योग आला.

अंबरनाथ येथील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करत पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. मोरिवली येथील कामगार उद्यानातील कामगार स्मारकाला अभिवादन करण्यात आले. तसेच अंबरनाथ नगरपरिषद येथे ध्वजारोहण करण्यात आले. महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.

यावेळी अंबरनाथ नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष मा.श्री. सदाशिव पाटील, मुख्याधिकारी मा.श्री. उमाकांत गायकवाड, उपमुख्याधिकारी मा.श्री. उमेश राऊत, शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक श्री.सुभाष साळुंखे, नगरसेविका सौ.मीना वाळेकर तसेच नगरसेविका मिनू सिंग यांच्यासह नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी भारतातील 2027 च्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर विविध तयारींबाबत चर्चा करण्यात आली व संबंधित बाबींची पाहणीही करण्यात आली.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

बुद्ध पौर्णिमा Graphic

करुणा, शांतता आणि समतेचा मार्ग दाखवणारे भगवान बुद्ध यांचे विचार आजही मानवजातीसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या शिकवणुकीतून सत्य, अहिंसा आणि बंधुभावाची ज्योत आपल्या जीवनात प्रज्वलित ठेवूया.

या पवित्र दिवशी आपण सर्वांनी द्वेष, अहंकार आणि अज्ञान यांना दूर सारत, ज्ञान, संयम आणि मानवतेच्या मार्गावर वाटचाल करण्याचा संकल्प करूया.

बौद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा! 🙏🏻

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

मराठी राजभाषा दिन Graphic

मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

मराठी भाषा आपल्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि अस्मितेचा भक्कम पाया आहे. छत्रपतींच्या पराक्रमाची, संतांच्या विचारांची आणि सामान्य माणसाच्या भावना व्यक्त करणारी ही समृद्ध भाषा आजही आपल्याला एकत्र बांधून ठेवते.

राजभाषा म्हणून मराठीचा सन्मान राखणे ही केवळ जबाबदारी नसून आपला कर्तव्यभाव आहे. प्रशासनात, शिक्षणात आणि दैनंदिन जीवनात मराठीचा अधिकाधिक वापर करून आपण आपल्या भाषेला खऱ्या अर्थाने बळ देऊ शकतो.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

महाराष्ट्र दिन व कामगार दिन Graphic

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

पराक्रम, परिश्रम आणि प्रगती यांची अखंड परंपरा जपणाऱ्या आपल्या महाराष्ट्र भूमीला मनःपूर्वक वंदन! छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या विचारातून प्रेरणा घेऊन उभा राहिलेला हा महाराष्ट्र, आजही कष्टकरी, शेतकरी आणि कामगारांच्या घामातून सतत पुढे जात आहे.

कामगार हा प्रत्येक विकासाचा कणा आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच उद्योगधंदे फुलतात, शहरं उभी राहतात आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते. त्यांच्या कष्टाला मुजरा आणि त्यांच्या योगदानाला सलाम.

या महाराष्ट्र दिनानिमित्त, आपल्या सर्वांच्या एकजुटीने, प्रामाणिक प्रयत्नांनी आणि सकारात्मक विचारांनी एक सक्षम, प्रगत आणि विकसित महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार करूया.

जय महाराष्ट्र! 🚩

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद