Ambarnath Portal
Directory, updates, and community links
Gudi Padwa Greetings

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

29 Apr 2026

2 linked posts
AIILSG विकसित महाराष्ट्र photos

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शताब्दी नागरी संवाद मालिका "विकसित महाराष्ट्र @२०४७" या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास उपस्थित राहण्याची संधी मिळाली.

शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी आवश्यक असलेल्या मार्गदर्शक दिशांवर सखोल चर्चा झाली. मान्यवरांच्या मार्गदर्शनातून भविष्यातील सुशासन, विकास आणि नागरिकाभिमुख दृष्टिकोन अधिक स्पष्ट झाला.

आयोजक श्री. रणजीत चव्हाण (अध्यक्ष,AIILSG) व डॉ. जयराज फाटक (महासंचालक AIILSG) यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, पदाधिकारी व जनप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यांच्या अनुभवी विचारांनी आणि मार्गदर्शनाने संवाद अधिक समृद्ध व परिणामकारक ठरला. अशा व्यासपीठांमधून विचारांची देवाणघेवाण होऊन विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलण्यास बळ मिळते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

स्वच्छता मोहीम Photos

अंबरनाथ परिसरात स्वच्छतेसाठी राबवण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेला भेट देण्याचा योग आला.

अंबरनाथ नगरपरिषदेच्या माध्यमातून स्थानिक नगरसेवक श्री. सचिन शांताराम गुंजाळ व नगरसेविका सौ. स्वाती अतिश पाटील यांच्या पुढाकारातून रॉयल पार्क व म्हाडा कॉलनी या परिसरात साचलेला कचरा साफ करण्यात आला. तसेच परिसर सुशोभित करण्यासाठी वृक्षारोपणाचा सुंदर उपक्रमही राबवण्यात आला.

स्वच्छता ही केवळ एक मोहिम नसून ती आपल्या प्रत्येकाच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग असायला हवा, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होऊन अंबरनाथ शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनवण्यास निश्चितच हातभार लागेल.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद