Ambarnath Portal
Directory, updates, and community links
Gudi Padwa Greetings

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

27 Apr 2026

2 linked posts
नगरपरिषदा महासंघ सभा Photos

नगरपरिषदा महासंघाचे कार्याध्यक्ष, मा.श्री. रणजीत चव्हाण व नगरपरिषदा महासंघाचे संचालक, मा.श्री. लक्ष्मणराव लटके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित नगरपरिषदा महासंघाच्या सभेत उपस्थित राहण्याची संधी मिळाली.

या सभेमध्ये नगरपरिषदा महासंघाच्या कार्यकारिणीवर नगराध्यक्षांची निवड करण्यात आली. यामध्ये कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.रुचिता घोरपडे यांची नगरपरिषदा महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली असून, राजुरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री.अरुण धोते यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

तसेच, मला नगरपरिषदा महासंघाच्या कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती मिळाल्याचा आनंद आहे. यासाठी सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

टेनिस क्रिकेट स्पर्धा Reel

माजी नगरसेवक श्री.संदीप लकडे व नगरसेविका सौ.पल्लवी संदीप लकडे आयोजित सायली एक्स मित्र मंडळ, अंबरनाथ यांच्या वतीने भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेत उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि खेळाचा मनमुराद आनंद अनुभवता आला.

"चेंडू, बॅट आणि थरार.. सगळं काही एकाच ठिकाणी, एकाच स्पर्धेत" या आकर्षक संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा खरोखरच उत्साह, थरार आणि एकजुटीचा उत्कृष्ट संगम ठरली.

या प्रसंगी अंबरनाथ शहरातील नगरसेवक, श्री.विश्वजीत करंजुले पाटील श्री.अभिजीत करंजुले पाटील, श्री.उमेश अनंता पाटील, श्री.विपुल पाटील, श्री.निखिल चौधरी, श्री.शैलेश भोईर तसेच बदलापूर शहरातील नगरसेवक श्री.राजेंद्र घोरपडे, श्री.रमेश सोळशे, श्री.किरण भोईर, श्री.सागोफ गोरे, श्री.संदेश ढमढरे, श्री.दिलीप बैकर, श्री.आकिफ कुवारी, श्री.रोहन पाटील, माजी नगरसेवक श्री.मनोज देवरे यांच्यासह अंबरनाथ शहरातील समाजसेवक श्री.चरण रसाळ, श्री. चंद्रकांत भोईर, श्री. सचिन गुडेकर व अनेक मान्यवर नगरसेवक उपस्थित होते. विशेष म्हणजे सर्व नगरसेवक स्वतः मैदानात उतरून क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले, ज्यामुळे वातावरण अधिकच रंगतदार आणि उत्साहपूर्ण झाले.

खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून संपूर्ण मैदान उत्साहाने दुमदुमून गेले होते. खेळातील जिद्द, संघभावना आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून खरोखरच प्रेरणादायी वातावरण अनुभवायला मिळाले.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद