Ambarnath Portal
Directory, updates, and community links
Gudi Padwa Greetings

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

26 Apr 2026

4 linked posts
डेंटल क्लिनिक ओपनिंग Photos

डॉ. विद्या सातपुते यांचे “डॉ. विद्याज अनंत डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर” चे उद्घाटन उत्साहात पार पडले. या शुभप्रसंगी उपस्थित राहण्याचा योग आला.

गणपती पूजन व समईदीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात करण्यात आली. सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहाच्या वातावरणात या नव्या क्लिनिकचा शुभारंभ झाला.

डॉ. विद्या सातपुते यांना या नव्या सुरुवातीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्या पुढील वाटचालीसाठी यश, प्रगती आणि उत्तम कार्याची सतत साथ लाभो, हीच शुभेच्छा.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

हिंदू संमेलन Photos

मोरीवली येथील गणपती मंदिरात मोरिवली वस्ती समिती आयोजित हिंदू संमेलन आज उत्साहात पार पडले. समाजातील एकता आणि सामाजिक विषयांवर संवाद साधण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आले होते.

या निमित्ताने नागरिकांशी प्रत्यक्ष भेट होत संवाद साधण्याची संधी मिळाली. उपस्थित नागरिकांच्या सहभागामुळे संमेलनाला विशेष उर्जा आणि अर्थ प्राप्त झाला. संवादातून निर्माण होणारी एकजूट आणि विश्वास हीच पुढील वाटचालीची खरी ताकद आहे, याची पुन्हा जाणीव झाली.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

रमाबाई रानडे पुण्यतिथी Graphic

स्त्रीशिक्षण, स्वावलंबन आणि समाजप्रबोधनाच्या क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या, प्रसिद्ध समाजसुधारक व ‘सेवासदन’च्या संस्थापिका रमाबाई रानडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि त्यांना स्वाभिमानाने उभं राहण्यासाठी त्यांनी आयुष्यभर केलेले कार्य आजही तितकेच प्रेरणादायी आहे. त्या काळात महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवून त्यांनी समाजात परिवर्तनाची ज्योत पेटवली.

‘सेवासदन’च्या माध्यमातून त्यांनी असंख्य स्त्रियांना शिक्षण, आधार आणि नवा आत्मविश्वास दिला. त्यांचे विचार आणि कार्य आजच्या पिढीसाठीही मार्गदर्शक आहेत.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

श्रीनिवास रामानुजन पुण्यतिथी Graphic

“संख्या, सूत्र आणि गणिताच्या अमर्याद विश्वात आपली अद्वितीय छाप उमटवणारे, थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🏻

अत्यंत कमी शैक्षणिक साधनं असूनही केवळ आपल्या प्रतिभेच्या जोरावर त्यांनी गणिताच्या अनेक गुंतागुंतीच्या सिद्धांतांना नवे आयाम दिले. त्यांच्या संशोधनामुळे आजही बीजगणित, संख्या सिद्धांत आणि अनंत श्रेणी यांसारख्या क्षेत्रात नवनवीन शोधांना दिशा मिळते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद