Ambarnath Portal
Directory, updates, and community links
Gudi Padwa Greetings

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

25 Apr 2026

3 linked posts
भिमजयंती Photos

डॉ. बी आर आंबेडकर फॅन क्लब ऑल पिंक सिटी एरिया, अंबरनाथ पूर्व यांच्या वतीने आयोजित भिमजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महान समाजसुधारक, ज्ञानसूर्य वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी करण्यात आली.

या प्रसंगी विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित मान्यवर व नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या विचारांचा जागर केला. संपूर्ण परिसर ‘जय भीम’च्या घोषणांनी दुमदुमून गेला आणि सामाजिक ऐक्य व बंधुत्वाचा संदेश देत हा उत्सव उत्साहात संपन्न झाला.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

शिवार्पणम Photos

नृत्यकलंजली इन्स्टिट्यूट ऑफ फाईन आर्ट आयोजित “शिवार्पणम” या दिव्य आणि भक्तिमय नृत्य कार्यक्रमाचा मनमोहक अनुभव घेण्याचा योग आला.

भगवान शिवाला अर्पण केलेल्या या सुंदर सादरीकरणात भक्ती, ताल, लय यांचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळाला. प्रत्येक कलाकाराने आपल्या नृत्याद्वारे प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केला आणि संपूर्ण वातावरण भक्तिरसात रंगून गेले.

या भक्तिमय कार्यक्रमाला श्री. सुनिल चौधरी (माजी नगराध्यक्ष, अंबरनाथ नगरपरिषद) तसेच इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. अशा प्रकारचे सांस्कृतिक उपक्रम आपल्या परंपरेची आणि कलेची सुंदर ओळख करून देतात.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

क्रिकेट स्पर्धा Photos

प्रभाग क्रमांक १६(अ)चे नगरसेवक श्री. संदीप अनंता तेलंगे यांच्या वतीने आयोजित "नगरसेवक चषक २०२६ अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा" उत्साहात पार पडली. या स्पर्धेत स्थानिक खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

यावेळी मी आणि उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंशी संवाद साधत त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. खेळाडूंच्या खेळातील जिद्द, मेहनत आणि टीमस्पिरिट यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक श्री. सुभाष साळुंखे, माजी नगरसेवक श्री. प्रकाश पाटील, माजी नगराध्यक्षा सौ. प्रज्ञा बनसोडे तसेच इतर मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद