Ambarnath Portal
Directory, updates, and community links
Gudi Padwa Greetings

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

24 Apr 2026

6 linked posts
घंटागाडी कामगार बैठक Photos

आज अंबरनाथ नगरपालिकेत घंटागाडी कामगार आपल्या विविध समस्या घेऊन भेटीस आले. सदर कामगार हे “समीक्षा” या कॉन्ट्रॅक्टर अंतर्गत कार्यरत आहेत.

त्यांनी मांडलेल्या प्रमुख अडचणी - कामगारांच्या पगारातून पीएफ कपात वाढ होत असली तरी कंपनीकडून त्यामध्ये कोणताही वाटा दिला जात नाही. सध्याचा पगार अत्यंत कमी असून त्यामध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात आली. तसेच, कामाच्या ठिकाणी आवश्यक असलेली युनिफॉर्म व सुरक्षा साधने जसे की ग्लोव्हज, शूज, मास्क आणि ओळखपत्र उपलब्ध करून दिले जात नाहीत, ही गंभीर बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.

याशिवाय, दिवाळी बोनस अगदी कमी दिला जात असल्याची तक्रार करण्यात आली. पगार वेळेवर न मिळण्याची समस्या देखील त्यांनी मांडली असून दर महिन्याच्या १० ते १५ तारखेच्या दरम्यान नियमित पगार देण्यात यावा, अशी ठोस मागणी करण्यात आली.

घंटागाडी कामगारांनी मांडलेल्या या सर्व समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित कॉन्ट्रॅक्टर व प्रशासन स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करून लवकरात लवकर योग्य तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

वॉर्ड नंबर ४, सर्व मित्र मंडळ Reel

वॉर्ड क्रमांक ४ मधील नागरिकांच्या समस्या आणि परिसराच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्व मित्र मंडळ आयोजित बैठकीत उपस्थित राहिले. यावेळी स्थानिक नगरसेवक श्री. पवन वाळेकर उपस्थित होते.

बैठकीनंतर परिसरातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. परिसरातील दुरावस्था लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या असून त्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. यावेळी सर्व मित्र मंडळाचे पदाधिकारी, सदस्य तसेच प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

नगरपालिका कार्यालय Photos

आज अंबरनाथ नगरपालिका येथे नगराध्यक्ष कार्यालयात शहरातील विविध भागातून आलेल्या नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या सूचना, समस्या व तक्रारी जाणून घेतल्या. प्रत्येक विषय गंभीरतेने ऐकून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने योग्य त्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या.

यामध्ये काही महिला लाडकी बहीण योजने संदर्भातील अडचणी मांडण्यासाठी आल्या होत्या, तर काही नागरिक रोजगारासंदर्भातील निवेदन घेऊन आले होते. तसेच एका नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील प्रश्नांबाबत निवेदन सादर केले. सर्वांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहत त्यांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लागाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात आले.

तसेच काही नागरिक सदिच्छा भेटीसाठी आले. त्यांनी आमंत्रण पत्रिका व शुभकार्यांच्या निमित्ताने भेट देऊन आपला स्नेह व्यक्त केला.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

सचिन तेंडुलकर वाढदिवस Graphic

क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलेलं एक नाव, क्रिकेटच्या विश्वात ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने एक वेगळंच स्थान निर्माण केलं, ज्यांच्या बॅटमधून केवळ धावा नाही तर इतिहास घडत गेला, भारतरत्न श्री. सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

लाखो चाहत्यांच्या हृदयात घर करणारा हा “मास्टर ब्लास्टर” केवळ एक खेळाडू नाही, तर प्रत्येक भारतीयासाठी अभिमान आणि प्रेरणेचं प्रतीक आहे.

या महान व्यक्तिमत्त्वास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशाची अखंड साथ लाभो, हीच सदिच्छा!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

राष्ट्रीय पंचायत राज दिन Graphic

लोकशाहीचा खरा आत्मा तळागाळात रुजवणारी आणि पार्लमेंटपासून गावपातळीपर्यंत प्रशासनाला दिशा देणारी पंचायत राज व्यवस्था…

राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त ग्रामविकासासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या सर्व पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांना मनःपूर्वक शुभेच्छा!

आपल्या गावाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक प्रशासन आणि जनतेचा सक्रिय सहभाग यामुळेच खऱ्या अर्थाने सक्षम भारत घडतो. सशक्त पंचायत राज व्यवस्थेद्वारे नवभारत घडवण्याचा नवा संकल्प करूया! 🇮🇳

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

दीनानाथ मंगेशकर पुण्यतिथी Graphic

संगीताच्या अविरत साधनेने भारतीय रंगभूमी आणि संगीतविश्व समृद्ध करणारे मास्टर दीनानाथ मंगेशकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

त्यांचा दमदार आवाज, अभिनयकौशल्य आणि संगीताची अतूट नाळ आजही प्रत्येक कलाकारासाठी प्रेरणादायी ठरते. त्यांच्या कार्यामुळे भारतीय संगीत आणि नाट्यपरंपरेला नवी उंची मिळाली. त्यांच्या स्मृतींना विनम्र श्रद्धांजली!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद