Ambarnath Portal
Directory, updates, and community links
Gudi Padwa Greetings

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

23 Apr 2026

4 linked posts
जिल्हाधिकारी कार्यालय Photos

अंबरनाथच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

अंबरनाथच्या अर्थसंकल्पास मंजुरी मिळविणे तसेच शहरातील विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा व नियोजन करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शहराच्या प्रगतीस गती देणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर सकारात्मक संवाद झाला.

शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक उपक्रमाची अंमलबजावणी वेळेत आणि प्रभावीपणे व्हावी, यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील.

यावेळी मा. मुख्याधिकारी श्री. उमाकांत गायकवाड, शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

पंडिता रमाबाई जयंती Graphic

ज्यांनी आपल्या कार्याने समाजात परिवर्तन घडवून आणलं, अशा महान व्यक्तिमत्त्व पंडिता रमाबाई यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम..🙏🏻

स्त्री शिक्षणाचा दीप प्रज्वलित करत, महिलांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखवणाऱ्या पंडिता रमाबाई यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांनी केवळ शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं नाही, तर स्त्रियांना स्वतःची ओळख निर्माण करण्याची ताकदही दिली.

त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत, प्रत्येक मुलगी शिक्षित, सक्षम आणि स्वावलंबी व्हावी, हीच खरी आदरांजली!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जयंती Graphic

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देत समाजातील अन्याय, अस्पृश्यता आणि भेदभाव यांविरुद्ध त्यांनी उभा केलेला लढा हा केवळ त्या काळापुरता मर्यादित नसून आजही आपल्या प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरतो. त्यांच्या विचारांतून समाज परिवर्तनाची खरी शक्ती दिसून येते.

शिक्षण, समाजजागृती आणि समानतेच्या तत्वांवर उभा राहणारा सक्षम समाज घडवण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अमूल्य आहे. त्यांच्या प्रेरणेतून आपणही समतेचा मार्ग स्वीकारत, एकजूट आणि सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी कटिबद्ध राहूया. त्यांच्या कार्याला आणि विचारांना शतशः नमन..🙏🏻

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

जागतिक पुस्तक दिन Graphic

पुस्तक दिनानिमित्त सर्व वाचक आणि रसिक बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा! पुस्तक हे केवळ अक्षरांचं भांडार नसून, ते विचारांना दिशा देणारं, व्यक्तिमत्त्व घडवणारं आणि समाजाला प्रगल्भ बनवणारं प्रभावी साधन आहे.

डिजिटल युगातही पुस्तकांचं महत्त्व अजूनही तितकंच अनमोल आहे. प्रत्येक पुस्तक आपल्याला नव्या जगाची ओळख करून देतं, नव्या विचारांना चालना देतं आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन समृद्ध करतं.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद