Ambarnath Portal
Directory, updates, and community links
Gudi Padwa Greetings

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

22 Apr 2026

5 linked posts
स्वच्छता मोहीम Photos

नगरपरिषदेच्या आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून आज फातिमा चर्च शेजारील कचरा कुंडी कायमस्वरूपी बंद करण्यात आली.

सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्याला प्राधान्य देत ही कारवाई करण्यात आली असून, त्या ठिकाणी सुंदर रांगोळी काढून परिसर अधिक स्वच्छ व आकर्षक बनविण्यात आला आहे.

शहरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ, सुरक्षित आणि नागरिकांना अभिमान वाटावा असा बनविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.

अशा उपक्रमांना नागरिकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सहकार्य हेच आमचे खरे बळ आहे. आपण सर्वांनी मिळून स्वच्छतेची ही चळवळ अधिक व्यापक केली, तर अंबरनाथ शहर निश्चितच एक आदर्श, स्वच्छ आणि निरोगी शहर म्हणून ओळखले जाईल.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

नगरपालिका कार्यालय Photos

आज अंबरनाथ नगरपालिकेत विविध भागांतून नागरिक भेटीस आले. आपल्या परिसरातील समस्या, अडचणी व सूचना त्यांनी अत्यंत मनमोकळेपणाने आणि विश्वासाने मांडल्या.

प्रत्येक नागरिकाचे म्हणणे संयमाने ऐकून त्यांच्या प्रत्येक मुद्द्याची गांभीर्याने दखल घेण्यात आली.

संबंधित विभागांशी तत्काळ समन्वय साधत योग्य आणि प्रभावी कार्यवाहीसाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांचा वाढता सहभाग आणि त्यांचा आमच्यावर असलेला विश्वास हेच आमच्यासाठी खरं बळ आहे.

त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला वेळेत आणि योग्य तोडगा मिळावा, सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि परिणामकारक व्हावी यासाठी आम्ही सातत्याने कटिबद्ध आहोत. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या समाधानासाठी प्रशासन नेहमीच तत्पर राहील.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

पहलगाम हल्ला स्मृतिदिन Grau

पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निरपराध नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली… 🙏🏻

त्याग, धैर्य आणि देशासाठीची निस्वार्थ भावना कायम आपल्या मनात जिवंत राहील.

श्री रामानुजाचार्य जयंती Graphic

श्री रामानुजाचार्य जयंतीनिमित्त मनःपूर्वक अभिवादन..🙏🏻

समता, भक्ती आणि ज्ञानाचा संदेश देणारे महान तत्त्वज्ञ श्री रामानुजाचार्य यांचे विचार आजही समाजाला एकतेचा आणि धर्मनिष्ठेचा मार्ग दाखवतात. त्यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी प्रेम, समरसता आणि सेवा यांचा मार्ग स्वीकारूया.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

जागतिक वसुंधरा दिन Graphic

आज जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आपण केवळ पर्यावरणाबद्दल बोलणार नाही, तर त्यासाठी ठाम पावलं उचलण्याचा निर्धार करूया.

वाढतं प्रदूषण, कमी होत चाललेली हरित क्षेत्रं आणि बदलतं हवामान ही केवळ समस्या नाहीत, तर आपल्या भविष्यासमोरील मोठी आव्हानं आहेत. आपण आज जे निर्णय घेऊ, त्यावर उद्याची पिढी कशी पृथ्वी अनुभवेल हे ठरणार आहे.

म्हणूनच प्रत्येकाने आपल्या स्तरावरून जबाबदारी घेत, निसर्ग संवर्धनाला प्राधान्य देणं गरजेचं आहे. स्वच्छता, वृक्षारोपण, पाण्याची बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैली हीच आपल्या वसुंधरेप्रती खरी सेवा आहे.

चला, आजपासून फक्त विचार नाही तर कृतीतून दाखवूया.. हरित, स्वच्छ आणि सुरक्षित पृथ्वी निर्माण करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊया!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद