Ambarnath Portal
Directory, updates, and community links
Gudi Padwa Greetings

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

21 Apr 2026

2 linked posts
अखंड हरिनाम सप्ताह पाचोण Reel

पाचोण येथील श्री हनुमान मंदिराच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सामुदायिक अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण या कार्यक्रमात सहभागी होण्याचा आनंद लाभला. या भक्तिमय वातावरणात थोर संत-महात्म्यांचे दर्शन घेण्याचे सौभाग्य लाभले, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब ठरली.

कार्यक्रमादरम्यान दीपप्रज्वलन करण्याची संधी मिळाली, हा क्षण विशेष स्मरणीय होता. अशा आध्यात्मिक सोहळ्यांमुळे समाजामध्ये एकात्मता, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, याची पुन्हा एकदा प्रचिती आली.

यावेळी माझ्यासोबत शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. मला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याबद्दल ग्रामस्थ मंडळ पाचोण व आंबेशिव बुद्रुक यांचे मनःपूर्वक आभार! राम कृष्ण हरी 🙏🏻

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

नगरपालिका कार्यालय Photos

आज अंबरनाथ नगरपालिकेत शहरातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी भेट देत आपल्या सूचना, तक्रारी व त्यांच्या परिसरातील विविध समस्या मांडल्या. प्रत्येक नागरिकाचे म्हणणे संयमाने ऐकून त्यांच्या समस्यांवर योग्य त्या उपाययोजना निश्चितपणे करण्यात येतील, असे त्यांना आश्वस्त केले.

यासोबतच काही नागरिक सदिच्छा भेटीसाठी आले होते. त्यांनी विविध सामाजिक, सांस्कृतिक व वैयक्तिक कार्यक्रमांच्या निमित्ताने आमंत्रण पत्रिका देऊन संवाद साधला. नागरिकांना वेळेत, पारदर्शक आणि समाधानकारक सेवा मिळावी यासाठी प्रशासन नेहमीच प्रयत्नशील असून, प्रत्येकाच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद