Ambarnath Portal
Directory, updates, and community links
Gudi Padwa Greetings

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

20 Apr 2026

5 linked posts
श्री बसवेश्वर महाराज जन्मोत्सव Reel

श्री बसवेश्वर भक्त मंडळ आयोजित श्री गुरु जगतज्योती श्री बसवेश्वर महाराजांचा जन्मोत्सव मातोश्री नगर येथील श्री बसवेश्वर मंदिरात अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. या पवित्र सोहळ्यात सहभागी होताना मनाला एक वेगळीच शांतता आणि समाधान लाभले.

यावेळी माझ्यासोबत नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील तसेच इतर मान्यवर आणि असंख्य भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.

भजन, पूजन आणि श्रद्धेने भारलेले वातावरण पाहून मन अगदी प्रसन्न झाले आणि नवचैतन्याची ऊर्जा मिळाली. अशा धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आपल्या समाजाला एकत्र बांधून ठेवतात, हीच भावना यावेळी अधिक दृढ झाली.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

नगरपालिका कार्यालय Photos

आज अंबरनाथ नगरपालिकेत शहरातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी भेट घेऊन आपल्या समस्या, तक्रारी व सूचना मांडल्या. प्रत्येक नागरिकाचा प्रश्न हा माझ्यासाठी महत्त्वाचा असून, त्यावर योग्य आणि प्रभावी उपाययोजना करण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे.

प्रशासनाच्या माध्यमातून तात्काळ आणि दीर्घकालीन तोडगे काढण्यावर भर देणार असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलली जातील, असा दृढ विश्वास व्यक्त करण्यात आला.

तसेच काही नागरिक सदिच्छा भेटीसाठी येऊन शुभेच्छा व्यक्त करत आपल्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली, ही बाब अधिक प्रेरणादायी आणि उर्जा देणारी ठरली.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

रंगतरंग सांस्कृतिक कार्यक्रम Photos

अंबरनाथ जनरल प्रॅक्टिशनर्स वेल्फेअर असोसिएशन आयोजित “रंगतरंग” या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली, यासाठी निमंत्रकांचे मनःपूर्वक आभार!

या कार्यक्रमात कला आणि संस्कृतीचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळाला. विविध नृत्य, संगीत आणि कलात्मक सादरीकरणांमधून कलाकारांनी आपल्या प्रतिभेची प्रभावी झलक सादर करत उपस्थितांची मनं जिंकली. प्रत्येक सादरीकरणातून भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा आणि सर्जनशीलतेची ताकद जाणवली. यावेळी माझ्यासोबत शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील देखील उपस्थित होते.

अशा उपक्रमांमुळे समाजात एकत्र येण्याची भावना अधिक दृढ होते आणि सांस्कृतिक वारसा जपण्याची प्रेरणा मिळते. या सुंदर आणि संस्मरणीय कार्यक्रमासाठी आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

श्री. संतोषजी आदक सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा Photos

समर्थ भारत संस्कार केंद्र आणि दि एज्युकेशन सोसायटी, अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मा. श्री. संतोषजी आदक यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

अंबरनाथच्या शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देत, ज्ञानदान, संस्कार आणि जनसंवादाच्या माध्यमातून समाजमनावर अधिराज्य गाजवणारे, निष्ठावंत संघ स्वयंसेवक व दि एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष सन्माननीय श्री. संतोषजी आदक यांनी आपल्या आयुष्याची ८०वर्षे पूर्ण करून ८१व्या वर्षात पदार्पण केले. त्यांच्या या समृद्ध, कर्तृत्ववान आणि आदर्श जीवनप्रवासाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

त्यांच्या कार्यातून अनेक पिढ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळाली असून समाजासाठी निस्वार्थ भावनेने केलेले कार्य खरोखरच वंदनीय आहे. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर समाजसेवेची शक्ती लाभो, ह्याच शुभेच्छा!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

भीम जयंती उत्सव Photos

शिवराय फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान, अंबरनाथ आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त कव्वाली व भीमगीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी मला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केल्याबद्दल प्रतिष्ठानचे मनःपूर्वक आभार! तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचेही आभार!

तसेच, बौद्ध एकता विकास मंडळ व धम्मदीप बुद्ध विहार आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात सहभागी होण्याचा योग आला. बाबासाहेबांनी दिलेल्या समता, बंधुता आणि न्यायाच्या विचारांची आजच्या काळात किती गरज आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, नवरेनगर, अंबरनाथ येथे डॉ. बी. आर. आंबेडकर प्रतिष्ठान आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती महोत्सवात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होता आले, यासाठी प्रतिष्ठानचे मनःपूर्वक आभार! तसेच अंबरनाथ शहरातील विविध ठिकाणी भीम जयंतीनिमित्त भेट देण्याचा योग आला, याचा विशेष आनंद झाला.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद