श्री दत्त मंदिर, ब्राह्मण सभा अंबरनाथ येथे शस्त्रविद्येचे महान गुरु, भगवान परशुराम यांच्या जयंती निमित्त दर्शन घेण्याचा पवित्र योग आला.
भगवान परशुराम हे भगवान विष्णूंचे सहावे अवतार असून त्यांच्या पराक्रम, शौर्य आणि धर्मरक्षणाच्या शिकवणी आजही समाजाला प्रेरणा देतात. त्यांच्या विचारांमधून सत्य, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श आपण सर्वांनी अंगीकारण्याची गरज आहे.
तसेच अंबरनाथ नगरपरिषद येथे जगतज्योत महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्याचे सौभाग्य मला लाभले. समाजात समानता, न्याय आणि मानवतेचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वर यांचे विचार आजच्या काळात अधिकच महत्त्वाचे ठरतात.
या दोन्ही महान विभूतींच्या जयंती निमित्त त्यांच्या कार्याला व विचारांना अभिवादन करत, समाजाच्या प्रगतीसाठी आणि सशक्त भविष्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प करूया. या प्रसंगी माझ्यासोबत शहराध्यक्ष व नगरसेवक, श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील देखील उपस्थित होते.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷