Ambarnath Portal
Directory, updates, and community links
Gudi Padwa Greetings

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

18 Apr 2026

5 linked posts
आर्य गुरुकुल School Reel

आज Aarya Gurukul School आयोजित “The Lineage of Bharat – From Vak to Seva” या सुंदर आणि विचारप्रवर्तक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला. या कार्यक्रमांतर्गत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादरीकरणांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे मनोहारी दर्शन घडवले.

शाळेतील मुला-मुलींनी पारंपरिक वेशभूषेत आकर्षक आणि देखणे नृत्य सादर करत उपस्थितांची मनं जिंकली. भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा, ज्ञानाची अखंड परंपरा आणि “जिज्ञासा - The Spirit of Inquiry” यावर आधारित हा उपक्रम खरोखरच मनाला स्पर्शून गेला.

भारतीय परंपरेनुसार ज्ञान हे निर्माण होत नाही, तर ते प्रकट होतं ही शिकवण आणि ‘सेवा हीच सर्वोच्च साधना’ हा विचार मनात खोलवर रुजवून गेला. अशा उपक्रमांमुळे आपल्या संस्कृतीशी नातं अधिक घट्ट होतं आणि पुढील पिढी घडवण्याची प्रेरणा मिळते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

सखी इव्हेंट Photos

रोटरी सभागृह, अंबरनाथ येथे "सखी इव्हेंट" आयोजित अक्षय्य तृतीया विशेष ग्राहक पेठ या भव्य प्रदर्शन व विक्री उपक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली.

या प्रदर्शनामध्ये हॅन्डमेड ज्वेलरी, फूड प्रॉडक्ट्स, हॅन्डमेड बॅग्स व पर्स, साडी, आर्ट आणि क्राफ्ट, विविध खाद्यपदार्थ, ड्रेस, घर सजावटीच्या वस्तू तसेच अनेक आकर्षक उत्पादनांचे स्टॉल्स पाहायला मिळाले.

प्रत्येक स्टॉलमध्ये महिला उद्योजकांचे कौशल्य, मेहनत आणि सर्जनशीलता स्पष्टपणे जाणवत होती. अशा प्रकारचे उपक्रम महिला उद्योजकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांना आपल्या कलेचे आणि उत्पादनांचे प्रदर्शन करण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळते, तसेच नव्या संधी निर्माण होतात.

अशा प्रकारचे उपक्रम म्हणजे खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. महिला उद्योजकांना आपले व्यवसाय वाढवण्यासाठी, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आणि मोठ्या संधी मिळवण्यासाठी असे व्यासपीठ अत्यंत गरजेचे आहे.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

महर्षी धोंडो केशव कर्वे जयंती Graphic

महान समाजसुधारक, स्त्रीशिक्षणाचे पुरस्कर्ते महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

समाजातील स्त्रियांना शिक्षणाची संधी मिळावी, त्यांना स्वाभिमानाने जगता यावं यासाठी त्यांनी आयुष्यभर अथक परिश्रम घेतले. त्या काळातील सामाजिक बंधनांना धैर्याने आव्हान देत त्यांनी विधवा पुनर्विवाह आणि स्त्रीशिक्षणाचा मजबूत पाया रचला.

SNDT Women's University सारख्या संस्थेची स्थापना करून त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी नवी दिशा दिली. त्यांच्या कार्यामुळे असंख्य महिलांना शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाचा मार्ग खुला झाला.

त्यांचं संपूर्ण आयुष्य हे समाजपरिवर्तनासाठी समर्पित होतं. त्यांच्या विचारांतून आजही समानता, शिक्षण आणि प्रगतीचा मार्ग स्पष्ट दिसतो. आजच्या पिढीने त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाज अधिक सक्षम आणि समतोल बनवण्यासाठी पुढाकार घेणं, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

दामोदर हरी चापेकर पुण्यतिथी Graphic

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सुरुवातीच्या क्रांतीच्या ज्योतींपैकी एक आणि प्रसिद्ध चापेकर बंधूंपैकी ज्येष्ठ असलेले दामोदर चापेकर यांनी अन्याय, अत्याचार आणि परकीय सत्तेविरुद्ध निडरपणे उभं राहण्याचा मार्ग दाखवला.

त्यांनी आपले भाऊ बालकृष्ण आणि वासुदेव चापेकर यांच्या सोबत ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र प्रतिकार उभारला. Assassination of W. C. Rand या घटनेद्वारे चापेकर बंधूंनी ब्रिटिश सत्तेला दिलेला प्रतिकार हा केवळ एक प्रसंग नव्हता, तर तो स्वाभिमान आणि देशभक्तीचा प्रखर संदेश होता.

त्यांच्या या धाडसी कृतीने पुढील अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा दिली आणि स्वातंत्र्याच्या लढ्याला नवी दिशा मिळाली.

त्याग, शौर्य आणि राष्ट्रनिष्ठा यांचा संगम असलेलं त्यांचं जीवन आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त, त्यांच्या विचारांना आणि बलिदानाला स्मरून, समाज आणि देशाच्या उन्नतीसाठी कार्य करण्याचा संकल्प करूया.

दामोदर हरी चापेकर आणि चापेकर बंधूंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

तात्या टोपे पुण्यतिथी Graphic

आज महान स्वातंत्र्यसैनिक तात्या टोपे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

1857 च्या स्वातंत्र्य संग्रामात आपल्या पराक्रम, शौर्य आणि अदम्य जिद्दीच्या बळावर त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा उभारला. संकटं कितीही मोठी असली तरी देशासाठी झुंज देण्याची प्रेरणा त्यांनी आपल्या कृतीतून दिली. त्यांचा लढा केवळ स्वातंत्र्यासाठी नव्हता, तर आत्मसन्मान, स्वाभिमान आणि देशभक्तीचा होता.

त्यांच्या बलिदानामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत, ही जाणीव कायम ठेवणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन देशाच्या प्रगतीसाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी सदैव पुढे राहणं, हीच आपली जबाबदारी आहे.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद