Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

16 Apr 2026

2 linked posts
नारीशक्ती वंदन अधिनियम Graphic

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ हा महिलांसाठी अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक निर्णय ठरत आहे.

महिलांना राजकीय क्षेत्रात समान संधी मिळावी, त्यांचा आवाज अधिक प्रभावी व्हावा यासाठी घेतलेले हे पाऊल खरोखरच स्त्री सक्षमीकरणाच्या दिशेने मोठी झेप आहे. या निर्णयामुळे भारतीय लोकशाही अधिक सक्षम होणार असून देशातील प्रत्येक महिलेसाठी ही एक सकारात्मक आणि प्रेरणादायी सुरुवात आहे.

या ऐतिहासिक उपक्रमाला आपला उत्स्फूर्त पाठिंबा देण्यासाठी आजच 9667173333 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि महिला सक्षमीकरणाच्या या अभियानात आपला सक्रिय सहभाग नोंदवा. नारीशक्तीचा सन्मान म्हणजे देशाचा अभिमान. चला, या परिवर्तनाच्या प्रवासात आपण सर्वजण सहभागी होऊया.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

नगरपालिका कार्यालय Photos

आज अंबरनाथ नगरपालिकेत शहरातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी त्यांच्या समस्या, सूचना व तक्रारी मांडल्या. या सर्व प्रश्नांच्या अनुषंगाने तत्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

नागरिकांच्या अडचणींवर वेळेत आणि परिणामकारक तोडगा काढणे हीच प्रशासनाची खरी जबाबदारी आहे. प्रत्येक प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहत, ठोस निर्णयांद्वारे त्यांचे निराकरण करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे.

तसेच काही नागरिक सदिच्छा भेटीसाठीही आले होते. त्यांच्या शुभेच्छा आणि विश्वास हीच माझ्यासाठी पुढे अधिक जबाबदारीने कार्य करण्याची प्रेरणा आहे. नागरिकांचा विश्वास जपत, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रत्येकाच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद