आज कंप्युटर शिक्षा अभियान या उपक्रमांतर्गत, नगरसेवक, श्री. उमेश अनंता पाटील व नगरसेविका सौ. दर्शना उमेश पाटील यांच्या संयुक्त प्रयत्नातून आयोजित संगणक वाटप कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला. याप्रसंगी अनेक मान्यवरांसह शाळेतील शिक्षक उपस्थित होते.
शहरातील एम.एम. स्कूल व मॅसाइया स्कूलमधील गरजू विद्यार्थ्यांना २० संगणकांचे वाटप करताना त्यांच्या डोळ्यातील आनंद आणि उत्साह खरोखरच उल्लेखनीय होता. डिजिटल शिक्षणाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या संधीचा लाभ घेत, त्यांनी तांत्रिक ज्ञानात प्रगती करत स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडवावे, अशी मनापासून इच्छा व्यक्त करते. आज त्यांच्या चेहऱ्यावर दिसलेला आत्मविश्वास आणि आनंद हेच उद्याच्या यशाची नांदी आहे.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷