Ambarnath Portal
Directory, updates, and community links
Gudi Padwa Greetings

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

14 Apr 2026

6 linked posts
अशोक स्तंभ उद्घाटन Reel

अंबरनाथ नगरपरिषद आवारात अशोक स्तंभाचे भव्य उद्घाटन मुरबाड विधानसभेचे आमदार मा. श्री. किसन कथोरे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याच प्रसंगी संविधान प्रस्ताविका फलकाचेही उद्घाटन करण्यात आले, ज्यामुळे संविधानिक मूल्यांप्रती आपली निष्ठा अधिक दृढ झाली.

या कार्यक्रमाला अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य श्री. गुलाबराव करंजुले पाटील, अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. उमाकांत गायकवाड, ज्येष्ठ नगरसेवक श्री. प्रदीप पाटील, नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक श्री. उमेश पाटील तसेच अंबरनाथ नगरपालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक व सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशोक स्तंभ व संविधान प्रस्ताविका फलकाच्या उद्घाटनातून न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांचा संदेश अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आला.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

सिटीस्कॅन सेंटर उद्घाटन Photos

गुरुनानक खालसा कॉलेज, मुंबई तर्फे, श्री धीरज कुमार आयलानी यांच्या पवित्र स्मरणार्थ "चार साहेबजादे एमआरआय आणि सिटी स्कॅन सेंटर"चा उद्घाटन सोहळा पार पडला.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य, श्री. गुलाबराव करंजुले पाटील, उल्हासनगरचे विद्यमान आमदार श्री. कुमार आयलानी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या अत्याधुनिक केंद्रामध्ये एमआरआय व सिटीस्कॅन सारख्या महत्त्वपूर्ण तपासण्या माफक दरात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार व परवडणारी आरोग्यसेवा मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

अग्निशमन दिवस Reel

अंबरनाथ नगरपालिका अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त अग्निशमन विभागास भेट देण्यात आली. १४ एप्रिल हा अग्निशमन दिवस व १४ ते २० एप्रिल हा कालावधी अग्निशमन सेवा सप्ताह म्हणून पाळण्यात येतो. ज्यामध्ये आपल्या अग्निशमन दलाच्या शौर्य, त्याग आणि सेवाभावाची आठवण करून दिली जाते.

यावेळी अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड व अग्निशमन दलप्रमुख भागवत सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन विभागातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून अग्निशमन सेवा सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.

१४ एप्रिल १९४२ साली मुंबई बंदरातील भीषण आगीमध्ये शौर्याने लढताना प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांचे स्मरण यावेळी करण्यात आले. समाजाच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र कार्यरत असलेल्या या वीर जवानांप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त केली.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती Reel

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी भेट देत कार्यक्रमांना उपस्थित राहून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माझ्यासोबत नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील व इतर सहकारी उपस्थित होते.

या पवित्र दिनानिमित्त बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा अधिक बळकट करण्याचा संकल्प करत, समाजात समता, स्वाभिमान आणि न्याय या मूल्यांची जोपासना करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल.

शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्यांच्या महान मंत्रातून प्रेरणा घेत, सक्षम व समतामूलक समाज घडविण्याचा निर्धार करूया.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती byte

भारतरत्न, सामाजिक न्यायाचे अधिष्ठाता आणि भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम!

ज्ञान, समता आणि स्वाभिमान यांचा दीप त्यांनी प्रज्वलित केला, जो आजही आपल्याला प्रकाश देत आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत न्याय पोहोचावा आणि प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा हक्क मिळावा, हीच त्यांची खरी शिकवण आहे.

चला, त्यांच्या विचारांचा वारसा जपत एक समताधिष्ठित, सक्षम आणि प्रगत भारत घडवण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊया. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा संदेश आपल्या कृतीतून साकार करूया.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती Graphic

विश्वरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार, समता, स्वाभिमान आणि न्यायाचे महान पुरस्कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

त्यांनी दिलेला शिक्षणाचा, समानतेचा आणि मानवी हक्कांचा संदेश आजही आपल्या प्रत्येकाला प्रेरणा देतो. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा, प्रत्येकाला समान संधी मिळावी, हीच त्यांची शिकवण आपण आपल्या कृतीतून जपूया.

बाबासाहेबांचे विचार आपल्या जीवनात उतरवून एक सशक्त, समतामूलक आणि प्रगत भारत घडवूया. "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा मंत्र आपल्या प्रत्येक पावलाला दिशा देणारा ठरो..

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद