आज अंबरनाथ नगरपालिकेत शहरातील विविध भागातून आलेल्या नागरिकांनी भेट देऊन त्यांच्या समस्या व अडचणींबाबत सविस्तर चर्चा केली.
सदर समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या दैनंदिन अडचणींना प्राधान्य देत त्यावर प्रभावी तोडगा काढण्यासाठी प्रशासन सतत कार्यरत राहील, असा विश्वास यावेळी देण्यात आला.
तसेच काही नागरिक सदिच्छा भेटीसाठीही आले होते. त्यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या अपेक्षा, सूचना आणि प्रेम जाणवले. हा विश्वास आणि पाठिंबा मला अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा देतो. भविष्यातही नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷