Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

12 Apr 2026

1 linked post
आशा भोसले श्रद्धांजली Graphic

आज स्वरांचा एक सुवर्ण अध्याय हरपला...

जेष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संगीतविश्व पोरकं झालं आहे. त्यांच्या मधुर, हृदयाला भिडणाऱ्या आवाजाने अनेकांच्या आयुष्यात आनंद, शांतता आणि भावनांचे रंग भरले. त्यांनी दिलेली प्रत्येक सुरेल भेट आजही आपल्या मनात जिवंत आहे… आणि कायम राहील.

त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो…🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 💐

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद