आज आमच्या गावी आयोजित श्री खंडेश्वर यात्रा व पीरसाहेब उरूस यात्रा उत्सव २०२६ या भव्य सोहळ्यात माझ्या परिवारासोबत सहभागी होण्याचा आनंद लाभला. 🙏🏻
यावेळी श्रींची महाआरती करण्याचा मान मिळाला, हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक क्षण ठरला. यासाठी संपूर्ण पाडळी रांजणगाव ग्रामस्थांचे व आयोजकांचे मनःपूर्वक आभार.
गावकऱ्यांचा उत्साह, श्रद्धा आणि एकोप्याची भावना पाहून मन भरून आले. अशा परंपरा जपत समाजाला एकत्र आणणाऱ्या उत्सवाचे पुढेही अधिक बळ देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम करूया, हीच अपेक्षा.
पाडळी रांजणगाव ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार! 🙏🏻
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷