अंबरनाथ नगरपालिकेत शहरातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी सदिच्छा भेट घेत त्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली. नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
तसेच बचत गटातील महिलांशी संवाद साधताना त्यांच्या उपक्रमांबद्दल जाणून घेतले तसेच त्यांच्या अडचणी आणि अपेक्षा समजून घेतल्या. महिलांचा उत्साह आणि सहभाग हा खरंच प्रेरणादायी आहे.
भास्कर नगर येथील नागरिकांनी पाण्याची टाकी उभारण्यासाठी निवेदन दिले. स्थानिक नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळावा यासाठी हे काम महत्त्वाचे असून, लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना
देण्यात आल्या.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷