Ambarnath Portal
Directory, updates, and community links
Gudi Padwa Greetings

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

09 Apr 2026

2 linked posts
नगरपरिषद कार्यालय Photos

आज नगरपरिषद कार्यालयात अनेक नागरिकांनी भेट देत विविध प्रश्न व अडचणींबाबत सविस्तर चर्चा केली. नागरिकांना वेळेत व समाधानकारक सेवा मिळावी यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असून, त्यांच्या समस्या तत्काळ मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

याचवेळी काही नागरिकांनी आपुलकीने विविध कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिका देखील दिल्या. आंबेडकरी विचार मंच सामाजिक संस्था यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती महोत्सवाचे आमंत्रण मिळाले. त्यानंतर चि. पंकज व चि.सौ.का.भूमिका यांच्या शुभविवाहासाठी त्यांनी निमंत्रण दिले. तसेच श्री समर्थ लॉजिस्टिक्स यांच्या भव्य उद्घाटन समारंभाचे निमंत्रण देण्यात आले.

या सर्वांनी दाखवलेला विश्वास व स्नेह याबद्दल मनःपूर्वक आभार. सर्व कार्यक्रमांसाठी हार्दिक शुभेच्छा.. अंबरनाथकरांच्या आनंदाच्या क्षणांत सहभागी होण्यासाठी मी आवर्जून उपस्थित राहण्याचा प्रयत्न करेन. 🙏🏻

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

साने गुरुजी पुण्यतिथी Graphic

जेष्ठ साहित्यिक, स्वातंत्र्यसेनानी शिक्षक व लेखक साने गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

“खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे” हा त्यांचा विचार आजही प्रत्येकाच्या मनात मानवतेची ज्योत प्रज्वलित करतो. त्यांनी आयुष्यभर प्रेम, करुणा, समता आणि सामाजिक बांधिलकी यांचा संदेश दिला. त्यांच्या लेखणीतून आणि कार्यातून समाजाला एक नवी दिशा मिळाली.

आजच्या धावपळीच्या जीवनात त्यांच्या विचारांची गरज अधिक जाणवते. माणुसकी, सहानुभूती आणि एकमेकांविषयी आदर या मूल्यांना आपण आपल्या आयुष्यात रुजवले, तरच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त, त्यांच्या विचारांचा वारसा जपत आपण प्रत्येकाने आपल्या कृतीतून प्रेम आणि माणुसकी जपण्याचा संकल्प करूया.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद