अंबरनाथ (पूर्व) येथील जय शिव सृष्टी को-ऑप. हाऊसिंग सोसायटीतील काही सदस्यांनी परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाबाबत तक्रार अर्ज दाखल करून तो माझ्यापर्यंत पोहोचवला आहे.
नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर याचा थेट परिणाम होत असून सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. या संपूर्ण विषयाची गांभीर्याने दखल घेत संबंधित प्रशासन व अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा करून या समस्येवर ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना व आवश्यक त्या कारवाईसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, जेणेकरून नागरिकांना लवकरात लवकर दिलासा मिळेल.
तसेच रिक्षा चालक-मालक संघटनेने विविध नागरी समस्यांबाबत विनंती अर्ज सादर केला आहे. काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले असून त्या ठिकाणी पीसीसी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या सर्व समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन नगरपालिकेत त्वरित कार्यवाही होण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या जातील. नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लागाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, तसेच शहरातील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी सर्वोत्तम आणि प्रभावी प्रयत्न करण्यात येतील.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷