Ambarnath Portal
Directory, updates, and community links
Gudi Padwa Greetings

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

Mon
Tue
Wed
Thu
Fri
Sat
Sun
1
3 posts
2
3
5 posts
4
3 posts
5
4 posts
6
3 posts
7
5 posts
8
5 posts
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30

06 Apr 2026

3 linked posts
BJP स्थापना दिन Reel

अंबरनाथ येथील भाजपा कार्यालयासमोर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात भाजपाचा ध्वज फडकावून ध्वजारोहण करत भाजपा स्थापना दिन अभिमानाने साजरा करण्यात आला.

या प्रसंगी परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमला आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला.

यावेळी महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य श्री. गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. सर्वांनी एकत्र येत पक्षाच्या विचारांप्रती निष्ठा व्यक्त केली आणि भविष्यातही अशाच जोमाने कार्य करण्याचा संकल्प करण्यात आला.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

BJP स्थापना दिन Graphic

देशसेवा, राष्ट्रहित आणि सबका साथ, सबका विकास या विचारसरणीला समर्पित असलेला हा प्रवास प्रत्येक कार्यकर्त्याच्या अथक परिश्रमामुळे अधिक बळकट होत गेला आहे.

या पक्षाच्या उभारणीत योगदान देणाऱ्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना मनःपूर्वक शुभेच्छा!

राष्ट्रनिर्माणाच्या या वाटचालीत आपण सर्वजण एकत्र येऊन अधिक मजबूत, सक्षम आणि समृद्ध भारत घडवण्याचा संकल्प करूया…

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

BJP video

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त सर्व माननीय नेतेमंडळी, पदाधिकारी आणि समर्पित कार्यकर्त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा!

या पक्षाला आज जे भव्य आणि मजबूत स्वरूप प्राप्त झाले आहे, ते अनेक दिग्गज नेत्यांच्या दूरदृष्टी, कठोर परिश्रम आणि लाखो कार्यकर्त्यांच्या निष्ठेमुळेच शक्य झाले आहे.

आपल्या सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे समाजसेवेचा आणि राष्ट्रनिर्मितीचा हा प्रवास अधिक बळकट होत आहे. आपल्या सर्वांच्या योगदानाबद्दल मनापासून आभार! हीच एकजूट आणि समर्पण भविष्यातही देशाला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेवो, हीच शुभेच्छा! 🇮🇳

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद