अंबरनाथ येथील सेंट थॉमस चर्च व मेथोडिस्ट चर्च येथे ईस्टर संडे निमित्त भेट देऊन सर्व ख्रिस्ती बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्याचा योग आला. ✨
या पवित्र प्रसंगी तेथील वातावरण अत्यंत शांत, श्रद्धामय आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले होते. तो अनुभव मनाला खूप समाधान देणारा आणि अंतर्मुख करणारा होता.
यावेळी नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील देखील उपस्थित होते. सर्वांनी मिळून प्रार्थनेत सहभाग घेत नवजीवन, आशा आणि शांततेचा संदेश आत्मसात केला.
ईस्टरचा हा पवित्र दिवस आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची प्रेरणा देतो. सर्वांच्या आयुष्यात आनंद, शांती आणि नवीन सुरुवातीचे क्षण लाभो, हीच प्रार्थना.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷