ग्रीन लँड टर्फ, पालेगाव येथे NGW Cricket Club आयोजित क्रिकेट स्पर्धेत सहभागी होता आले, हा खूप खास अनुभव ठरला.
या वेळी मैदानावर अनेक मुली आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि त्यांचा खेळाप्रती असलेला उत्साह पाहून खूप आनंद वाटला. त्यांच्यासोबत मैदानात उतरून बॅट हातात घेतली आणि काही क्षण खेळण्याची संधी मिळाली, तेव्हा एक वेगळाच उत्साह अनुभवायला मिळाला.
त्यानंतर खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची संधी मिळाली. त्यांचा आत्मविश्वास, मेहनत आणि जिद्द यामुळे त्या प्रत्येक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. मैदानावर दिसणारी त्यांची तयारी, टीम स्पिरिट आणि सकारात्मकता खरोखर प्रेरणादायी होती.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷