बदलापूर येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर तसेच चिखलोली गाव, अंबरनाथ येथील हनुमान मंदिर येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त दर्शन घेण्याचा योग आला.
या पवित्र दिवशी प्रभू हनुमानाचे दर्शन घेताना मन भक्तीभावाने भारावून गेले. मंदिर परिसरात दुमदुमणारा जय श्रीराम आणि हनुमानाचा गजर, भाविकांची श्रद्धा आणि उत्साह यामुळे वातावरण पूर्णतः भक्तिमय झाले होते.
श्री विठ्ठल-रखुमाई यांच्या दर्शनाने मनाला शांतता लाभली, तर हनुमानाच्या चरणी नतमस्तक होताना एक वेगळीच ऊर्जा आणि आत्मविश्वास मिळाला. प्रभूंच्या कृपेने प्रत्येकाला योग्य मार्गदर्शन आणि यश प्राप्त होवो, हीच प्रार्थना.. 🙏🏻
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷