Ambarnath Portal
Directory, updates, and community links
Gudi Padwa Greetings

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

Mon
Tue
Wed
Thu
Fri
Sat
Sun

30 Mar 2026

2 linked posts
प्रमाणपत्र वितरण सोहळा photo

महिला बालकल्याण विभाग, अंबरनाथ नगरपरिषद यांच्या वतीने आयोजित फॅन्सी बॅग प्रशिक्षण शिबिराचा प्रमाणपत्र वितरण सोहळा श्री शिव समर्थ व्यायाम शाळा, कानसई येथे पार पडला.

या उपक्रमाला आपल्या विभागातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळाला. या शिबिरातून महिलांनी नवीन कौशल्य आत्मसात करत स्वावलंबनाकडे एक भक्कम पाऊल टाकले आहे. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आत्मविश्वासच या उपक्रमाच्या यशाची खरी ओळख आहे.

आपल्या महिला केवळ घरापुरत्या मर्यादित नसून, त्या स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहत समाजाच्या प्रगतीत मोलाचं योगदान देत आहेत. अशा उपक्रमांमधून महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी माझे प्रयत्न पुढेही सुरू राहतील.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Walima समारंभ

आदिल अली आणि तबस्सुम यांच्या वालीमा समारंभात सहभागी होत त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या…

त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात आनंद, प्रेम आणि यशाने भरलेली जावो हीच प्रार्थना.. एकमेकांच्या साथीने प्रत्येक क्षण अधिक खास आणि सुंदर होत राहो अशा शुभेच्छा दिल्या.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद