प्रभाग क्रमांक २१, हनुमान नगर, अंबरनाथ येथे आयोजित सेवा शिबिरात उपस्थित राहून नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा आणि त्यांच्या गरजा जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
नगरसेवक श्री. महेश फुलोरे आणि माजी नगरसेवक श्री. भरत फुलोरे यांनी पुढाकार घेऊन ही सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे.
आयुष्मान कार्ड, ABHA कार्ड, ई-श्रम कार्ड यांसारख्या महत्त्वाच्या सेवा नागरिकांपर्यंत सहज आणि सुलभ पद्धतीने पोहोचवताना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळाला.
शासनाच्या योजना फक्त कागदावर न राहता त्या प्रत्येक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील आहोत.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷