Ambarnath Portal
Directory, updates, and community links
Gudi Padwa Greetings

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

Mon
Tue
Wed
Thu
Fri
Sat
Sun

28 Mar 2026

3 linked posts
ख्रिश्चन सिमेटरी reel

ख्रिश्चन सिमेटरी असोसिएशन, अंबरनाथ येथे भेट देत पाहणी करण्यात आली. या प्रसंगी ख्रिश्चन सिमेटरी अध्यक्ष फादर कांचन लोंढे, सेक्रेटरी विजू ओमेन तसेच इतर ख्रिस्ती बांधव उपस्थित होते.

या भेटीदरम्यान परिसराची सविस्तर पाहणी करून विविध बाबींचा आढावा घेण्यात आला. तसेच उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या अडचणी, सूचना व अपेक्षा जाणून घेता आल्या. संबंधित विषयांवर सकारात्मक चर्चा करत भविष्यातील आवश्यक सुधारणा व उपाययोजनांबाबतही विचारमंथन करण्यात आले.

समाजातील प्रत्येक घटकाच्या भावना समजून घेत, त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहील. या भेटीदरम्यान मिळालेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.. 🙏🏻

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

मोदीजी graphic

जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीतही सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली होत आहे.

पेट्रोल-डिझेलवरील एक्ससाईज ड्युटीमध्ये करण्यात आलेली कपात ही जनतेसाठी मोठा दिलासा देणारी आणि महागाईवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

नव्या भारताचे कणखर नेतृत्व करणाऱ्या आदरणीय पंतप्रधानांचे मनःपूर्वक आभार 🙏🏻

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

कार्यक्रम photos

S.D.M. इंग्लिश स्कूल, महेंद्र नगर येथे आयोजित मोफत मेगा मेडिकल कॅम्पला उपस्थित राहिले. या माध्यमातून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांची पाहणी करण्यात आली. त्याचसोबत ग्रीन सिटी, अंबरनाथ येथे आयोजित माता की चौकी कार्यक्रमात उपस्थित राहून भक्तीमय वातावरणाचा आनंद घेतला.

तसेच मोरीवली गाव येथे श्री जरी मरी आई पालखी सोहळ्यात सहभागी होता आले. आई जरी मरीच्या चरणी अंबरनाथच्या सुख-समृद्धीसाठी व रक्षणासाठी मनापासून गाऱ्हाण घातले. त्याचसोबत जवसाई गाव, महेंद्र नगर येथे श्रीराम नवमी निमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला, जिथे परंपरा आणि संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

याच दिवशी चि. निशिकांत व सौ. का. पूजा या नवदांपत्याच्या शुभविवाह सोहळ्यात उपस्थित राहून त्यांना मनःपूर्वक शुभाशीर्वाद देण्याचा आनंदही लाभला. समाजकार्य, संस्कृती, श्रद्धा आणि आनंदाचे हे सर्व क्षण एकाच दिवशी अनुभवता आले, ही खरोखरच माझ्यासाठी समाधानाची बाब आहे.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद