Ambarnath Portal
Directory, updates, and community links
Gudi Padwa Greetings

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

Mon
Tue
Wed
Thu
Fri
Sat
Sun

27 Mar 2026

4 linked posts
नगरपरिषद शाळा Reel

अंबरनाथ नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक ९ मध्ये प्रलंबित असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला. संबंधित कॉन्ट्रॅक्टरशी चर्चा करून ही सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तसेच, विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय येत्या सोमवारपर्यंत उपलब्ध करून देण्याचे आश्वस्त केले. स्वच्छतागृहातील पाण्याच्या सुविधेबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

शाळेत सुरक्षा रक्षक नसल्याचे निदर्शनास आल्याने तात्काळ सुरक्षा रक्षक नेमण्यात आला असून, आजपासून त्याची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, शाळेच्या दरवाजांना कडी-कुलूप नसल्याने ती त्वरित लावून घेण्याचे आदेश देण्यात आले.

येत्या सोमवारपर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आल्या आहेत.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

स्वामीनारायण जयंती graphic

स्वामीनारायण संप्रदायाचे संस्थापक भगवान स्वामीनारायण यांनी दिव्य विचारांनी आणि महान कार्याने समाजाला सत्य, अहिंसा, सदाचार आणि भक्तीचा मार्ग दाखवला.

त्यांच्या शिकवणींमुळे असंख्य लोकांचे जीवन उजळले आणि आजही त्यांच्या तत्वांचा प्रकाश आपल्याला योग्य दिशेने मार्गदर्शन करत आहे. भगवान स्वामीनारायण यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन..

या पवित्र दिवशी त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून, त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प करूया.

जय स्वामीनारायण! 🙏🏻

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

रंगभूमी दिन Graphic

कलाकार आपल्या अभिनयातून समाजाला आरसा दाखवतो, कधी हसवतो, कधी रडवतो, तर कधी विचार करायला भाग पाडतो.. त्याच्या कलेतून संस्कृतीची जपणूक होते आणि नव्या पिढीला योग्य दिशा मिळते.

रंगभूमी ही केवळ करमणुकीचं माध्यम नसून, ते समाज परिवर्तनाचं प्रभावी साधन आहे… आजच्या या जागतिक रंगभूमी दिनानिमित्त, रंगभूमीला आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्व नाट्यकलावंतांना मनःपूर्वक प्रणाम आणि हार्दिक शुभेच्छा!

आपली कला अशीच फुलत राहो, आणि समाजाला प्रेरणा देत राहो, हीच सदिच्छा…

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

राम नवमी reel

श्रीराम नवमी निमित्ताने लोकनगरी संकुल, गुड मॉर्निंग सोसायटी, राहुल इस्टेट, नवजीवन मित्र मंडळ, फुलेनगर तसेच शिवाजी चौक, कैलास नगर व इतर विविध ठिकाणी प्रभू श्रीराम यांचे दर्शन घेण्याचा योग लाभला.

या भक्तिमय वातावरणात सहभागी होत प्रत्येक ठिकाणी उत्साह, श्रद्धा आणि भक्तीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

तसेच ग्रीन सिटी येथे आयोजित ‘माता की चौकी’ मध्ये सहभागी होऊन मन प्रसन्न व आनंदित झाले. अशा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे समाजात एकात्मता व सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, याची पुन्हा एकदा प्रचिती आली.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद