श्रीराम नवमीच्या पावन निमित्ताने कोहोजगाव येथील श्रीराम नवमी उत्सव, तसेच अंबरनाथमधील श्री हेरंब सेवा समिती व मे फ्लॉवर सोसायटी येथे श्रीरामांचे आशीर्वाद घेण्याचा मान लाभला.
तसेच धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृह येथे ‘गीत रामायण’ पाहण्याचा व अनुभवण्याचा योग आला. या पवित्र दिवशी विविध ठिकाणी जाऊन भाविकांशी संवाद साधताना, प्रभू श्रीरामांच्या आदर्शांची, संस्कारांची आणि धर्मनिष्ठ जीवनमूल्यांची जाणीव अधिक दृढ झाली.
समाजात एकता, सद्भावना आणि संस्कृती जपण्याची प्रेरणा या उत्सवातून मिळते, हे प्रत्येक ठिकाणी प्रकर्षाने जाणवले.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ 🪷