Ambarnath Portal
Directory, updates, and community links
Gudi Padwa Greetings

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

Mon
Tue
Wed
Thu
Fri
Sat
Sun

25 Mar 2026

4 linked posts
राम नवमी reel

प्रभू श्रीरामांच्या पवित्र तत्वांवर दृढ विश्वास ठेवून, त्यांच्या प्रेरणेने सुसंस्कृत आणि आदर्श जीवन जगण्याचा संकल्प करूया.

सत्य, धर्म, कर्तव्यनिष्ठा आणि न्याय या मूल्यांचा अंगीकार करून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न करूया. प्रभू श्रीरामांचे आदर्श हेच आपल्या आचरणाचे मार्गदर्शक ठरावेत हीच प्रार्थना.

सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा! श्री प्रभू रामांच्या कृपेने प्रत्येकाच्या घरी सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदो.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

राम नवमी graphic

धर्म, मर्यादा आणि आदर्श जीवनाचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या प्रभू श्रीरामांच्या पावन जन्मोत्सवानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.

प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सदैव सुख, शांती, समृद्धी आणि यश नांदो हीच प्रार्थना.

CA सौ.तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Meetings

आज अंबरनाथ नगरपालिकेत कोहोचगाव येथील ग्रामस्थांनी सदिच्छा भेट घेऊन श्री राम नवमी उत्सवाचे निमंत्रण दिले. ख्रिश्चन बांधवांसमवेत ओल्ड एज होम संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच शहरातील नागरिकांच्या रस्त्यासंबंधित समस्या समजून घेतल्या व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वस्त करण्यात आले.

अंबरनाथच्या उज्ज्वल भविष्यासाठी सकारात्मक पावले उचलण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. अंबरनाथच्या जनहितासाठी मी सदैव कटिबद्ध आहे.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Atal udyan

आज अंबरनाथ येथील अटल सूर्योदय उद्यान" येथे भेट देत उद्यानाची सविस्तर पाहणी केली. यावेळी उद्यानातील स्वच्छता, हरित वातावरण, नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सोयी-सुविधा तसेच लहान मुलांसाठी असलेल्या खेळण्याच्या व्यवस्थेचा आढावा घेतला.

यासोबतच उद्यानामध्ये बास्केटबॉल व बॅडमिंटन या खेळांसाठी स्वतंत्र सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. या क्रीडा सुविधांमुळे युवक-युवतींना खेळासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध होणार असून, नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनशैलीला देखील चालना मिळणार आहे.

नागरिकांना सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी असे सुंदर व सुस्थितीत उद्यान उपलब्ध असणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. उद्यान अधिक आकर्षक, सुरक्षित आणि सर्वसमावेशक करण्यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

अशा प्रकारच्या सार्वजनिक ठिकाणांच्या विकासामुळे शहराचा दर्जा उंचावतो आणि नागरिकांच्या जीवनमानातही सकारात्मक बदल घडतो.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷"

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद