अंबरनाथ येथील चिखलोली डम्पिंग ग्राऊंडवरील आग ही केवळ घटना नसून नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर इशारा आहे.
मी स्वतः प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. परिसरात पसरलेला धूर, दुर्गंधी आणि नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास याची प्रत्यक्ष जाणीव झाली.
स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना त्यांच्या भावना, अडचणी आणि सतत होत असलेल्या त्रासाबद्दलची नाराजी स्पष्टपणे जाणवली. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करून आग नियंत्रणात आणणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि डंपिंग ग्राऊंड संदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची सूचना देण्यात आली.
या पाहणीदरम्यान नगरसेवक अभिजीत करंजुले पाटील, विश्वजीत करंजुले पाटील, शैलेश भोईर तसेच पालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
आपल्या अंबरनाथ शहराला स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🌸