अंबरनाथच्या क्रीडा क्षेत्राला दिशा देण्याच्या दृष्टीने अंबरनाथ नगरपरिषदेच्या वतीने नेताजी मैदान येथील आउटडोअर स्टेडियम फेज-२ चा उद्घाटन सोहळा खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
या आधुनिक स्टेडियममुळे स्थानिक खेळाडूंना सरावासाठी आणि आपले क्रीडा कौशल्य दाखवण्यासाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. अंबरनाथच्या क्रीडा विकासाला नवी चालना देणारा हा उपक्रम ठरेल.
यावेळी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौर ॲड. सौ. अश्विनी कमलेश निकम, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर ॲड. सौ. हर्षाली विजय चौधरी, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, अंबरनाथ नगरपरिषद श्री. उमाकांत गायकवाड, उपनगराध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती व नगरसेवक श्री. सदाशिव हेंदर पाटील, मा. नगराध्यक्ष श्री. सुनील वामन चौधरी यांच्यासह सर्व नगरसेवक आणि मान्यवर उपस्थित होते.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷