Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

19 Nov 2026

2 linked posts
अंबरनाथ नगरपरिषद येथे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा करण्यात आला. Photos

अंबरनाथ नगरपरिषद येथे भारताच्या माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त शपथ घेण्यात आली. 🙏

यावेळी उपनगराध्यक्ष, आरोग्य समिती सभापती तथा नगरसेवक श्री. सदाशिव हेंदर पाटील, मुख्याधिकारी श्री. उमाकांत गायकवाड, अतिरिक्त मुख्याधिकारी श्री. डॉ. मयुरेश भुजबळ, उपमुख्य अधिकारी. श्री. उमेश राऊत, शहर अभियंता श्री. राजेश तडवी, भांडार विभाग प्रमुख

श्री. स्वप्नील जाधव आणि आस्थापना विभाग प्रमुख सौ.रिशिता शिंदे उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

झाशीची राणी लक्ष्मीबाई जयंतीनिमित्त अभिवादन Graphic

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महान वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏

मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेला लढा आणि दाखवलेले अतुलनीय धैर्य भारतीय इतिहासात सदैव अजरामर राहील. 🚩

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद