Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

14 Nov 2026

2 linked posts
क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे जयंती Graphic

थोर आद्य क्रांतिकारक, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!🙏

न्याय, समानता आणि स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या त्यांच्या संघर्षाची आणि शौर्याची गाथा सदैव स्मरणात राहील.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

पंडित जवाहरलाल नेहरू जयंती & बालदीन Graphic

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आणि आधुनिक भारताच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏

मुलांवर अपार प्रेम करणाऱ्या चाचा नेहरू यांच्या स्मृतींना अभिवादन करत सर्व बालकांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! बालकांचे आजचे स्वप्न उद्याच्या उज्ज्वल भविष्याचा पाया ठरो! 🌸✨

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद