Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

12 Nov 2026

2 linked posts
दिवाळीनिमित्त विधवा महिलांना भेटवस्तूंचे वाटप. Photos

दिवाळीनिमित्त विधवा महिलांना भेटवस्तूंचे वाटप करून त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला. सणाच्या आनंदात प्रत्येकाचा सहभाग असावा आणि प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचे क्षण यावेत, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. 🪔🌸

यावेळी अनुसूचित जाती अध्यक्ष – अंबरनाथ शहर श्रीमती. ज्योती डोंगरे, अंबरनाथ पूर्व शहर सचिव सौ. रीना मोरे, बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) – १, अंबरनाथ विधानसभा श्री. संतोष शिंदे, पदाधिकारी श्री. सुरेश जाधव आणि अंबरनाथ विस्तारक श्री. पांडुरंग भोसले उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

रिपब्लिकन जनरल कामगार युनियन, अंबरनाथ तालुका व भाजप अंबरनाथ शहर आयोजित ‘कष्टकरी बांधवांसोबत आनंदाची दिवाळी’ कार्यक्रमाला उपस्थिती. Photos

मोरोली नाका येथे रिपब्लिकन जनरल कामगार युनियन, अंबरनाथ तालुका आणि भारतीय जनता पार्टी, अंबरनाथ शहर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कष्टकरी बांधवांसोबत आनंदाची दिवाळी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमांतर्गत कष्टकरी महिला भगिनींना साडी आणि दिवाळी भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. कष्टकरी बांधवांसोबत दिवाळीचा आनंद आणि स्नेह वाटण्याचा हा एक सुंदर उपक्रम ठरला. 🪔🌸

यावेळी अंबरनाथ शहराध्यक्ष श्री. दिलीप सोनकांबळे, नगरसेविका सौ. मीना वाळेकर, सौ. मीनू सिंह, सौ. वैशाली थेटे समाजसेवक श्री. जगदीश थेटे, श्री. बबलू सिंह आणि समाजसेविका सौ. श्रद्धा गुंजाळ उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद