Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

10 Nov 2026

2 linked posts
दिवाळी पाडवा आणि बलीप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा! Graphic

नव्या संकल्पांचा, समृद्धीचा आणि नात्यांमधील प्रेम अधिक दृढ करणारा हा मंगलमय सण सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि भरभराट घेऊन येवो. राजा बळी यांच्या दानशूरतेचा आणि वचनपालनाचा आदर्श आपल्या सर्वांना सदैव प्रेरणा देत राहो, हीच सदिच्छा!✨

सर्वांना दिवाळी पाडवा आणि बलीप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸🪔

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

गोवर्धन पूजेच्या हार्दिक शुभेच्छा! Graphic

निसर्गाचे रक्षण, संवर्धन आणि त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश देणारा गोवर्धन पूजेचा सण! 🙏

भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलून दिलेला संरक्षण आणि एकतेचा संदेश आजही आपल्याला प्रेरणा देतो.

या पावन पर्वानिमित्त सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद नांदो, हीच श्रीकृष्णचरणी प्रार्थना! 🌸

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद