Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

09 Nov 2026

4 linked posts
दिवाळीनिमित्त अंबरनाथ नगरपरिषदेतील कर्मचारी व खातेप्रमुखांना भेटवस्तू देण्यातआल्या Reel

दिवाळीनिमित्त अंबरनाथ नगरपरिषदेतील सर्व विभागांचे कर्मचारी तसेच खातेप्रमुख यांना दिवाळीच्या भेटवस्तू देऊन सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी गटनेते तथा कल्याण जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक श्री. अभिजीत करंजुले पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

शहराच्या विकासात आणि कामकाजात योगदान देणाऱ्या सर्व कर्मचारीवर्गाचे सहकार्य असेच कायम लाभत राहो, हीच सदिच्छा!

सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

दिवाळीनिमित्त अंबरनाथ क्षयरुग्णांना पोषण आहाराचे वाटप. Reel

दिवाळीच्या सणानिमित्त अंबरनाथ नगरपरिषदेच्या क्षयरोग पथकातील ५० क्षयरुग्णांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. या रुग्णांना पुढील सहा महिन्यांसाठी पोषण आहार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

यावेळी सर्व रुग्णांनी नियमित औषधोपचार घ्यावेत, योग्य काळजी घ्यावी आणि अंबरनाथ शहरातून क्षयरोग हद्दपार करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमावेळी क्षयरोग विभागाचे सुपरवायझर श्री. सतीश देशपांडे आणि त्यांचे कर्मचारी उपस्थित होते.

क्षयरुग्णांची दिवाळी आनंदाची आणि आरोग्यदायी व्हावी, हीच मनापासून सदिच्छा! 🌸

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

श्री माँ अंबे व श्री बाबा रामदेव मंदिर परिवाराच्या २० व्या वार्षिक महोत्सवानिमित्त आयोजित महाप्रसादी कार्यक्रमाला उपस्थिती. Photos

श्री माँ अंबे व श्री बाबा रामदेव मंदिर परिवार आयोजित २० व्या वार्षिक महोत्सवानिमित्त महाप्रसादी कार्यक्रमाला उपस्थित राहून दर्शन घेतले. धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात सहभागी होण्याचा आनंद मिळाला. 🙏🌸

यावेळी गटनेते तथा कल्याण जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक श्री. अभिजीत करंजुले पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

दिवाळीनिमित्त टीजेएसबी बँक, अंबरनाथ शाखेला सदिच्छा भेट. Photos

दिवाळीनिमित्त टीजेएसबी बँक, अंबरनाथ शाखेत भेट देऊन दीपप्रज्वलन करून दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला आणि सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. 🪔✨

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद