Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

08 Nov 2026

6 linked posts
दिवाळीनिमित्त GBK ग्रुपच्या कार्यालयात लक्ष्मीपूजन! Reel

दिवाळीच्या मंगलमय पर्वानिमित्त GBK ग्रुपच्या कार्यालयात लक्ष्मीपूजन करून सुख, समृद्धी आणि भरभराटीसाठी प्रार्थना करण्यात आली.🪔✨

या मंगलमय प्रसंगी ग्रुपमधील सर्व सहकाऱ्यांना भेटवस्तू देऊन एकत्रितपणे दिवाळीचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.

सर्व सहकाऱ्यांचे प्रेम, सहकार्य आणि योगदान असेच कायम लाभत राहो, हीच सदिच्छा!सर्व सहकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

दिवाळीनिमित्त खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट! photos

दिवाळीनिमित्त खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत स्नेहपूर्ण भेट झाली.✨

यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, गटनेते तथा कल्याण जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक श्री. अभिजीत करंजुले पाटील, नगरसेवक तथा अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष श्री. विश्वजीत करंजुले पाटील, गटनेते श्री. रवी करंजुले, शिवसेना अंबरनाथ उपशहरप्रमुख ह.भ.प. श्री. पुरुषोत्तम उगले महाराज, समाजसेवक श्री. चंद्रकांत भोईर आणि श्री. सचिन गुडेकर उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

दिवाळी शुभेच्छा Reel

प्रकाशाचा, मांगल्याचा आणि आनंदाचा सण म्हणजे दिवाळी! 🪔✨

या मंगलमय सणानिमित्त सर्वांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंद नांदो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना, बळीराजाच्या आयुष्यातही सुखाचे आणि समाधानाचे दिवस यावेत. त्यांच्या कष्टांना चांगले फळ मिळावे आणि त्यांच्या घरातही आनंदाची दिवाळी साजरी व्हावी. येणारा प्रत्येक सण त्यांच्या आयुष्यात नवी उमेद आणि आनंद घेऊन येवो, हीच मनापासून प्रार्थना! 🌸

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

दिवाळीनिमित्त भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाण साहेबांची सदिच्छा भेट. Photos

दिवाळीनिमित्त भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाण साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांचे मार्गदर्शन लाभले. ✨

याप्रसंगी गटनेते तथा कल्याण जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक श्री. अभिजीत करंजुले पाटील, नगरसेवक तथा अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष श्री. विश्वजीत करंजुले पाटील, नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. स्वाती अतिश पाटील, नगरसेवक श्री. पवन वाळेकर, श्री. सचिन गुंजाळ, श्री. मनीष गुंजाळ, नगरसेविका सौ. मीनू सिंह, सौ. सुजाता भोईर आणि युवा मोर्चा अध्यक्ष श्री. अतिश पाटील उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

लक्ष्मीपूजन शुभेच्छा! Graphic

नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते | शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तु ते || 🙏🪷

माता महालक्ष्मीच्या कृपेने प्रत्येकाच्या घरात सुख, शांती, धन-धान्य आणि समृद्धी नांदो. जीवनातील प्रत्येक स्वप्नाला नवी दिशा मिळो आणि आनंदाचा प्रकाश सदैव उजळत राहो, हीच श्री महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना! ✨

सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔🌸

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा! Graphic

भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध करून अधर्मावर धर्माचा विजय मिळवला, त्याच विजयाचे प्रतीक म्हणून साजरा होणारा हा सण प्रत्येकाच्या जीवनातून दुःख, नकारात्मकता आणि अंधार दूर करून सुख, शांती व आनंद घेऊन येवो, हीच सदिच्छा! 🙏✨

आपणांस व आपल्या परिवारास नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद