Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

07 Nov 2026

3 linked posts
लोकनगरी,म्हाडा कॉलनीतील पाणीसमस्येबाबत बैठक. Photos

अंबरनाथ पूर्व येथील लोकनगरी परिसरातील म्हाडा कॉलनी तसेच आजूबाजूच्या सोसायट्यांमधील नागरिकांच्या पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.

यावेळी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांना लवकरात लवकर नवीन पाणी जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल आणि पाणीपुरवठ्याची समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.

यावेळी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. स्वाती अतिश पाटील, नगरसेवक श्री. सचिन गुंजाळ आणि युवा मोर्चा अध्यक्ष श्री. अतिश पाटील उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

राष्ट्रीय कर्करोग जनजागृत दिन Graphic

कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात जागरूकता हीच पहिली पायरी!🎗️

राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिनानिमित्त सर्वांना आवाहन आहे की, आपल्या आरोग्याची काळजी घ्या, नियमित तपासणी करा आणि कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्या.

वेळीच निदान, योग्य उपचार आणि सकारात्मक विचार हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली! 💗🎗️

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

दीपावली शुभेच्छा! Graphic

दीपावलीचा प्रकाश आपल्या आयुष्यात नवी ऊर्जा, आनंद आणि उत्साह घेऊन येवो!✨🪔

या मंगलमय दीपावलीच्या सणानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! प्रत्येकाच्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान नांदो. नात्यांमध्ये प्रेमाचा गोडवा वाढो आणि प्रत्येकाचे आयुष्य आनंदाच्या प्रकाशाने उजळून निघो, हीच सदिच्छा! ✨🌸

शुभ दीपावली! 🪔

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद