Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

05 Nov 2026

3 linked posts
जैन शासनरत्न श्री. जयंतीभाई जिवराज नागडा प्रवेशद्वार, नवीन स्ट्रीट लाईट पोल व कानसई दत्त मंदिर चौक येथील ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचा लोकार्पण सोहळा. Photos

विकासकामांच्या माध्यमातून अंबरनाथ शहराच्या प्रगतीला चालना देणारे विविध लोकार्पण सोहळे उत्साहात पार पडले.✨

यावेळी जैन शासनरत्न श्री. जयंतीभाई जिवराज नागडा प्रवेशद्वाराचे आणि नवीन स्ट्रीट लाईट पोलचे लोकार्पण करण्यात आले. तसेच, कानसई दत्त मंदिर चौक येथे ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख श्री. गोपाळ लांडगे, उपनगराध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती श्री. सचिन सदाशिव पाटील, माजी नगराध्यक्ष श्री. सुनील चौधरी, गटनेते तथा कल्याण जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक तथा बांधकाम समिती सभापती श्री. शैलेश भोईर, नगरसेविका तथा पाणीपुरवठा व जलनिःसारण समिती सभापती सौ. सुनीता तानाजी पाटील, नगरसेविका तथा शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती सौ. रेश्मा गुडेकर, नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. स्वाती पाटील, नगरसेविका ॲड. अपर्णा भोईर, सौ. मोनिका रिचर्ड, सौ. पल्लवी लकडे, नगरसेवक श्री. कुणाल भोईर, श्री. निखिल चौधरी, श्री. स्वप्नील बागुल, श्री. सुभाष साळुंखे, श्री. सचिन सदाशिव पाटील आणि श्री. संदीप तेलंगे उपस्थित होते.

नागरिकांच्या सोयीसाठी आणि परिसराच्या विकासासाठी अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

वसुबारस शुभेच्छा Graphic

दिवाळीचा पहिला दिवस, वसुबारसचा मंगलमय सण!✨

गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करून तिचे पूजन करण्याची आपली समृद्ध परंपरा जपणारा हा पवित्र दिवस. गोमातेच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो!

सर्वांना वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌺

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

रमा एकादशीच्या शुभेच्छा! Graphic

रमा एकादशीच्या पावन निमित्ताने सर्व भक्तांना मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा!🙏

पांडुरंगाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना! 🌺

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद