अंबरनाथ शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने Spruce Up कंपनीच्या ‘जटायू’ या आधुनिक व्हॅक्यूम आधारित कचरा संकलन मशीनचे प्रात्यक्षिक (डेमो) घेण्यात आले.
या प्रात्यक्षिकावेळी उपनगराध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती श्री. सदाशिव हेंदर पाटील, अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. उमाकांत गायकवाड, नगरसेवक तथा बांधकाम समिती सभापती श्री. शैलेश भोईर, गटनेते तथा कल्याण जिल्हा सरचिटणीस श्री. अभिजीत करंजुले पाटील, नगरसेविका तथा पाणीपुरवठा व जलनिःसारण समिती सभापती सौ. सुनीता तानाजी पाटील, नगरसेवक श्री. सचिन सदाशिव पाटील, नगरसेवक श्री. मनेश गुंजाळ, आरोग्य विभागाचे एचओडी श्री. राजेश शिंदे, आरोग्य विभागाचे श्री. महेश तायडे, युवा मोर्चा अध्यक्ष श्री. अतिश पाटील, ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्री. दीपक कोतेकर आणि समाजसेवक श्री. सचिन गुडेकर उपस्थित होते.
या मशीनच्या साहाय्याने रस्त्यांवरील, पदपथांवरील तसेच सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा व्हॅक्यूम तंत्रज्ञानाद्वारे थेट बंदिस्त कंटेनरमध्ये जमा करता येतो. त्यामुळे स्वच्छता कामात यांत्रिकीकरणाला चालना मिळण्यासोबतच सफाई कर्मचाऱ्यांचा कचऱ्याशी थेट संपर्कही कमी होण्यास मदत होईल.
अंबरनाथ शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनविण्यासाठी आधुनिक स्वच्छता तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा आमचा प्रयत्न आहे. 🌱
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷