रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ, लेवा पाटील समाज मंडळ, अंबरनाथ व इनर व्हील क्लब ऑफ अंबरनाथ हिल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत वैद्यकीय शिबिरास उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधत त्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधांची माहिती घेतली.
नागरिकांना आवश्यक आरोग्य तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शन उपलब्ध करून देणारा हा उपक्रम निश्चितच समाजोपयोगी आणि कौतुकास्पद आहे. आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासोबतच नागरिकांना आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे आहे.
यावेळी उपनगराध्यक्ष तथा आरोग्य सभापती श्री. सदाशिव हेंदर पाटील, नगरसेवक श्री. सचिन गुंजाळ, नगरसेवक श्री. संदीप तेलंगे, नगरसेवक श्री. निखिल चौधरी, नगरसेविका सौ. सुजाता होईल, नगरसेविका सौ. रोहिणी भोईर तसेच डॉ. कुणाल चौधरी उपस्थित होते.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷