हॉली फेथ स्कूल, अंबरनाथ येथे विश्वकर्मा विकास संस्था, अंबरनाथ यांच्या वतीने संस्थेचा वर्धापन दिन व विश्वकर्मा पूजन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. समाजाच्या विकासासाठी तसेच सर्वांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. या निमित्ताने समाजातील एकता, बंधुभाव आणि विकासाची भावना अधिक दृढ करण्याचा संकल्प करण्यात आला.
या कार्यक्रमास भाजप कल्याण जिल्हा उपाध्यक्ष श्री. संजय अदक, नगरसेविका सौ. अनिता संजय अदक तसेच विश्वकर्मा विकास संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷